आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूरसंचार सचिवपदी दीपक, राकेश गर्ग यांना हटवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सरकारने राकेश गर्ग यांना दूरसंचार सचिव पदावरून हटवून अल्पसंख्याक विभागासारख्या लो प्रोफाइल मंत्रालयात नियुक्त केले आहे. त्यांची १७ जुलै २०१४ रोजी दूरसंचार सचिव पदावर नेमणूक करण्यात आली होती. १९८० च्या बॅचचे सनदी अधिकारी गर्ग याचवर्षी नोव्हेंबरमध्ये निवृत्त होणार आहेत.

उत्तर प्रदेश केडरेच जे.एस. दीपक आता दूरसंचारचे नवीन सचिव असतील. त्यांची या पदावर नेमणूक करण्यात आली आहे. आतापर्यंत त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाची जबाबदारी होती. मध्य प्रदेशचे केडरच्या अरुणा शर्मा त्यांच्या जागी येतील. आतापर्यंत त्या मध्य प्रदेशात कार्यरत होत्या. विविध मंत्रालये आणि संस्थांमध्ये दहा नवीन सचिवांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. भविष्य निर्वाह निधीचे आयुक्त हैदराबाद केडरचे डॉ. कृष्ण कुमार जालान यांची सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते अनुप पुजारी यांची जागा घेतली. पुजारीदेखील सेवानिवृत्त होणार आहेत. कर्नाटकच्या १९८२ च्या बॅचचे एस. के. पटनायक यांना कृषी सचिव पदी नियुक्त करण्यात आले आहे. ते सिराज हुसैन यांची जागा घेतील. ते याच महिन्यात निवृत्त होणार आहेत.

श्रीवास्तव यांच्याकडे अन्न प्रक्रियेची सूत्रे
उत्तर प्रदेश १९८२ च्या बॅचचे अविनाश के. श्रीवास्तव यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ते सेवानिवृत्त होणाऱ्या रंगलाल जमुदा यांच्या जागी येतील. श्रीवास्तव आतापर्यंत कृषी मंत्रालयात विशेष सचिव म्हणून कार्यरत होते.