आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • JuD Chief Hafiz Saeed Addresses Rally At Minar E Pakistan

काश्मीर हा दरवाजा असेल, हिंदुस्तान उद्‍धवस्त करू, दहशतवादी हाफिज सईद बरळला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/लाहोर- पाकिस्तानातील दहशतवादी संघटना 'जमात उद दावा'चा प्रमुख आणि मुंबईतील 26/11 च्या हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याने भारताला पुन्हा एकदा धमकावले आहे. 'जमात उद दावा' या संघटनेवर बंदी असतानाही पाकिस्तान सरकारकडून सहकार्य केले जात आहे.

'काश्मीर हा दरवाजा असेल आणि हिंदुस्तान उद्‍धवस्त करू', अशा शब्दात हाफिजने धमकी दिली आहे. तसेच काश्मीर मुद्दा तातडीने सोडवावा, असा इशाराही हाफिज सईदने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे. काश्मीरमधील लोकांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी पाकिस्तानने पुढाकार घ्यायला हवा, असे हाफिज सईद याने शुक्रवारी एका परिषदेत म्हटले.

'मीनार ए पाकिस्तान'मध्ये संबोधित करताना हाफिज म्हणाला, भारत जर अमेरिकेच्या मदतीसाठी अफगानिस्तान जवान पाठवू शकत असेल तर काश्मीरमधील लोकांची मदत करण्याचा मुझाहिदीनला अधिकार आहे. कश्मीरमधील लोक मदतीसाठी आवाज देत असून त्यांना मदत करणे हे आमचे कर्तव्य असल्याचेही हाफिज याने यावेळी सांगितले.

दोन दिवसीय परिषद (मजमा) शुक्रवारी संपन्न झाली. हाफीजचे समर्थक मोठ्यासंख्येने पाकिस्तानातून लाहोरला पोहोचले होते. नवाज शरीफ सरकारने या मजमासाठी कराची आणि हैदराबादहून दोन विशेष रेल्वे गाड्या सोडल्या होत्या.

हाफिज सईद याला दहशतवादी घोषित केल्यानंतरही तो पाकिस्तान खुलेआम वावरत आहे. भारताला प्रेमाची भाषा समजत नाही. त्यामुळे पाकिस्तान सरकारने काश्मीरमधील लोकांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे हाफिज सईदने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना आवाहन केले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, 'मीनार ए पाकिस्तान'मध्ये आयोजित करण्यात आलेल्या परिषदेचे छायाचित्रे...