आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Judge A.P.Shah Appointed As Chairman Of Road Safty Panel

रोड सेफ्टी पॅनलच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती ए.पी.शहा यांची नियुक्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश ए.पी.शहा यांची सर्वोच्च न्यायालयाने रोड सेफ्टी पॅनलच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रस्ते अपघातातील जखमींना मदत करणा-या चांगल्या व्यक्तींच्या (गुड समॅरिटन) बचावासाठी हे पॅनल काही मार्गदर्शक तत्त्वे सुचवणार आहे. माजी आयपीएस अधिकारी डी.आर. कार्तिकेयन आणि बी.एल.वोहरा यांचाही पॅनलमध्ये समावेश करण्यात आला आहे. नवीन सदस्यांनी पॅनलचा अहवाल तसेच अन्य बाबींचा अभ्यास करून अंतिम अहवाल सादर करावा, असे न्यायालयाने सांगितले आहे.


व्यवस्थापन मंडळ
राष्‍ट्रीय रस्ते सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापन मंडळ स्थापनेबाबत सध्या विचार सुरू असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ऑस्कर फर्नांडिस यांनी राष्‍ट्रीय रस्ते सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सांगितले.