आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Judge Appointment Should Be On Reservation; Planned Chief Justice P. Sadashivam Say

न्यायाधीशांच्या नियुक्तीत आरक्षण हवे; नियोजित सरन्यायाधीस पी. सदाशिवम यांची अनुकूलता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि अल्पसंख्याकांना जास्तीचे प्रतिनिधित्व देऊन उच्च न्यायव्यवस्थेत न्यायाधीशांच्या नियुक्त्यांमध्ये आरक्षण देण्यास नियोजित सरन्यायाधीश पी. सदाशिवम यांनी अनुकूलता दर्शवली.


न्यायव्यवस्थेत आरक्षण देण्याबाबतचा नियम नसला तरी स्वत:होऊनच नियोक्त्याने असे आरक्षण दिले पाहिजे. अशा प्रकारच्या नियुक्त्या करताना कोणताही नवीन कायदा करण्याची गरज नाही. मात्र पूर्णत: गुणवत्तेच्या निकषांवरच न्यायाधीशांच्या नियुक्त्या झाल्या पाहिजेत. पण त्याच वेळी आपल्या देशाची एकूण रचना पाहता खालच्या घटकातील लोकांना वर येण्याची संधी देणे आवश्यक आहे. त्यांना आपण प्रतिनिधित्व दिलेच पाहिजे. ते जर किमान पात्रतेच्या अटी पूर्ण करत असतील तर अशा उमेदवारांचा विचार व्हायला हवा, असे ते म्हणाले.