आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युक्तिवाद होण्याआधीच जजनी निकाल टायपिंगला दिला, आरुषी पुस्तकाच्या लेखकाचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - प्रत्येक सुनावणीच्या वेळी न्यायाधीश मीर यांना (तलवार यांचे वकील) दोनच गोष्टी सांगत असत, एक म्हणजे लवकर लवकर संपवा, दुसरी लेखी तर्क जमा करा. मीर सांगतात की, ते तलवार यांना ओळखतदेखील नव्हते. ते इतके प्रयत्न करत आहेत; पण त्याचा फायदा होईल की नाही तेही माहीत नव्हते. निकाल सुनावणीच्या आधीच निश्चित करण्यात आला होता. बचाव पक्षाचे तर्क पूर्णपणे ऐकले जातच नव्हते. इतकेच नव्हे, तर सीबीआय तपासातही अनेक त्रुटी होत्या. साक्षीदारांना ब्लॅकमेल केले गेले होते, असे अनेक दावे 'आरुषी' पुस्तकात लेखक, पत्रकार अविरूक सेन यांनी केले आहेत.

सेन यांच्या म्हणण्यानुसार, आरुषी - हेमराज दुहेरी हत्याकांडाचे निकालपत्र तयार करतेवेळी न्यायाधीशांनी त्यांचा मुलगा आशुतोषला इंग्रजी टायपिंगचे काम दिले होते. कारण इंग्रजी टायपिंग करणा-या स्टेनोची व्यवस्था त्यांना करता आली नव्हती. जेव्हा लेखकाने निवृत्त न्यायाधीशांना विचारले की, एक पेज टाइप करण्यास किती वेळ लागतो? त्यांनी उत्तर दिले दहा मिनिटे. पुस्तकानुसार, आशुतोषही चर्चेत सहभागी झाले. त्यांनी सांगितले की, मी स्वत:च टायपिंग केले. निर्णय २१० पानांचा होता. त्यामुळे टायपिंगला महिन्यापेक्षा जास्त वेळ लागला. न्यायमूर्ती शामलाल २५ नोव्हेंबर २०१३ ला निर्णय देणार होते. मीर यांनी शेवटच्या युक्तिवादाला २४ ऑक्टोबर रोजी सुरुवात केली. पुढचे दोन आठवडे त्यांनी २४ तर्क मांडून त्यावर चर्चा केली. हे तर्क, डॉ. तलवार यांची सुटका करू शकले असते, परंतु न्यायाधीश व त्यांचा मुलगा अाधीच ठरवून निर्णय लिहिण्यास बसले..या खटल्यात २५ नोव्हेंबर २०१३ रोजी न्यायमूर्ती शामलाल यांनी दीपक व नूपूर तलवार यांना दोषी ठरवले होते.

मला पशू बनवले : तलवार
डॉ. तलवार यांच्या म्हणण्यानुसार, तुरुंगात असताना कायदामंत्र्यांची भेट झाली. उपतुरुंगाधिका-यांनी त्यांना बोलावले होते. असे वाटत होते की आम्ही प्राणिसंग्रहालयातील प्राणी आहोत, म्हणून त्याला पाहण्यासाठी सगळे येत असावेत. एकेदिवशी आयपीएलमधील टीममधील किंग्ज ११चा क्रिकेटर परमिंदर अवाना यालाही मला भेटवण्यात आले. का? का भेटवले, कुणाच्या सांगण्यावरून भेटवले काहीच समजले नाही? तुरुंगाने आम्हाला पशू बनवले होते. काय प्रतिक्रिया द्यावी तेही कळत नव्हते.

पुढे वाचा, तलवार यांच्या डायरीतील काही नोंदी यांचा समावेश पुस्तकातही आहे (नोव्हेंबर -डिसेंबर २०१३)