आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायमूर्ती नियुक्ती प्रकरणी सरकारशी मतभेद संपुष्टात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - न्यायपालिकेत लवकरच उच्च पदांवर न्यायमूर्तींची नियुक्ती होण्याची शक्यता दिसत आहे. सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायमूर्तींच्या नियुक्तीवरून सरकार आणि न्यायपालिका यांच्यातील बहुतांश मतभेद संपुष्टात आले आहेत. काही मुद्द्यांवर मतभेद असले तरी त्यावरही लवकरच चर्चेनंतर तोडगा निघेल.

एका कार्यक्रमात सरन्यायाधीश ठाकूर यांनी पत्रकारांना सांगितले की, दोन-तीन आठवड्यांत मेमोरेंडम ऑफ प्रोसीजर (एमओपी) तयार होईल. हाच दस्तऐवज न्यायपालिकेत उच्च पदांवर न्यायमूर्तींची नियुक्ती नियंत्रित करेल. राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग कायदा रद्द करून कॉलेजियम प्रणाली बहाल करून सर्वोच्च न्यायालयानेच एमओपी तयार करण्याचे निर्देश दिले होते.दरम्यान, न्यायमूर्ती जे. एस. वर्मा स्मृती व्याख्यानात सरन्यायाधीश ठाकूर यांनी विचार स्वातंत्र्याबाबत आपले विचार मांडले. ते म्हणाले की, माध्यमांचे स्वातंत्र्य हेच नागरिकांचे स्वातंत्र्य आहे. माध्यमांना स्वतंत्र व्हायचे असेल तर त्यांना निष्पक्ष व्हावे लागेल.
बातम्या आणखी आहेत...