आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Judiciary Collegium News In Marathi, Divya Marathi, Supreme Court

कॉलेजियम रद्द करण्यास आव्हान, याचिकांवर सोमवारपासून होणार सुनावणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - न्यायमूर्ती नियुक्तीसंबंधीच्या व्यवस्थेला (कॉलेजियम) रद्द करून त्याऐवजी राष्ट्रीय न्यायकि नियुक्ती आयोगाची स्थापना करण्यासंबंधी कायदा दुरुस्तीला सर्वोच्च
न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाच्या स्थापनेला विरोध करणाऱ्या चार जनहित याचिका सर्वोच्च न्याया लयात दाखल आहेत .
१२१ वी घटना दुरुस्ती करताना नवीन सरकारने आयोगाची स्थापना केली, परंतु ही कृती अवैध स्वरूपाची आहे. संसदेने कॉलेजियमसंबंधीची दोन विधेयके मंजूर केली आहेत . त्याला सदर याचिकांमधून वि रोध करण्यात आला आहे. काही वकि लांनी याचिका दाखल केल्या. त्यावर सरन्याया धीश आर. एम. लोढा यांनी या प्रकरणाची सुनावणी सोमवारपासून सुरू होईल, असे स्पष्ट केले. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल विश्वजित भट्टाचार्य, वकील आर. के. कपूर, मनोहरलाल शर्मा यांनी याचिका दाखल केल्या आहेत . लोकसभेत या संबंधीच्या वि धेयकाला मंजुरी मिळाल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १४ ऑगस्ट रोजी राज्यसभेत विधेयकाला हिरवा कंदील दाखवण्यात आला होता.