आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - न्यायपालिकेतही भ्रष्टाचार, नात्यागोत्यांचे हितसंबंध, पक्ष पातासारख्या वाईट प्रवृत्ती जम बसवत असल्याची खंत भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केली आहे. यामुळे न्यायाधीशांच्या नियुक्ती प्रक्रियेत बदल केले जावेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
आपल्या ब्लॉगमध्ये अडवाणी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश जे.एस. वर्मा आणि रुमल पाल यांच्या सूचनांचा उल्लेख केला आहे. दोघांनीही सध्याची कॉलेजियम पद्धत सशक्त नसल्याचे म्हटले होते. कॉलेजियममध्ये देशाचे मुख्य न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाच्या चार सर्वात वरिष्ठ न्यायाधीशांच्या नियुक्त्या आणि बदल्यांना अंतिम रूप देण्यात येते.
पद्धतीत समतोल आणण्यासाठी न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदल्यांच्या संदर्भात प्रशासनाचीही भूमिका असावी, असा सल्ला अडवाणी यांनी दिला. यासाठी त्यांनी विधी आयोगाच्या 2008 मधील 214 व्या अहवालाचा हवाला दिला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.