आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमिरुद्दीन शहा उपराष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत; सोशल मीडियातून दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आगामी उपराष्ट्रपतिपदासाठी अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू जमिरुद्दीन शहा यांची प्रबळ दावेदारी असल्याची चर्चा सोशल मीडियातून सुरू झाली आहे. विद्यमान उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी उपराष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांनीदेखील अलीगड विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषवलेले आहे. ‘विकिपीडिया’ने इंडियन व्हाइस प्रेसिडंट इलेक्शन-२०१७ नावाचे पेज तयार केले आहे. त्यात शहा यांचे नाव अग्रस्थानी आहे. त्यानंतर नजमा हेतपुल्ला, डॉ. मुरली मनोहर जोशी, नागरी उड्डयन मंत्री अशोक गजपती राजू, विजय बहुगुणा इत्यादींची नावे आहेत. अन्सारी यांचा कार्यकाळ ऑगस्टमध्ये संपणार आहे.
 
बातम्या आणखी आहेत...