आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Just Two Day Before Warn Uttarakhand ; Weater Department

दोन दिवस आधीच सतर्कतेचा इशारा उत्तराखंडला दिला होता; हवामान विभाग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आस्मानी संकट उद्भवणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दोन दिवस आधीच उत्तराखंड सरकारला दिला होता. 16 जून पासून या राज्याचे हवामान बदलले होते. तत्पूर्वी 14 जून रोजीच हवामान खात्याने राज्यातील सर्व संबंधित विभागांसह प्रथमच मुख्यमंत्री कार्यालयालाही सतर्कतेचा इशारा दिला होता. बुधवारी राष्‍ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या बैठकीत हवामान खात्याने त्याची पुष्टीही दिली. याबाबत आपत्ती निवारण मंत्री यशपाल आर्य यांना विचारणा केली असता, ‘इशारे येतच असतात’, असे उत्तर त्यांनी दिले होते. विभागीय हवामान खात्याचे उपसंचालक डॉ. ओ.पी. सिंह यांनी सांगितले की, आम्ही स्पष्ट शब्दांत कळवले होते की, हा केवळ हवामानाचा अंदाज नसून नैसर्गिक संकटाची स्पष्ट सूचना आहे.