आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जस्टिस काटजू म्हणाले- गोमांस खाणे काही पाप नाही, संधी मिळाली तर आणखी खाईन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: जस्टिस मार्कंडेय काटजू)

नवी दिल्ली- सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती (जस्टिस) मार्कंडेय काटजू यांनी गोवंश हत्याबंदीला विरोध दर्शवून खळबळ उडवून दिली आहे. मी गोमांस खाल्ले असून संधी मिळाल्यास आणखी खाईल, असे काटजू यांनी आपल्या ब्लागमध्ये लिहिले आहे.
काटजू म्हणाले, गोवंश हत्याबंदी लोकाशाहीच्या विरोधात जाणारी आहे. गोवंश हत्याबंदीची मागणी राजकीय हेतुने करण्‍यात आली आहे. परंतु, यामुळे विदेशात आपल्या देशाची प्रतिमा मलीन झाली आहे. अनेक राष्ट्रे आपल्यावर हसण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत.
काटजूंनी आणखी एक तर्क लावला आहे आणि तो म्हणजे गोमांस हे स्वस्त प्रोटीन मिळण्याचा एक चांगला स्रोत आहे. त्यामुळे गोमांस खाण्यात मला काहीच चुकीचे वाटत नसल्याचे काटजू यांनी म्हटले आहे. नागालंड, मिझोरम, त्रिपुरा आणि केरळमध्ये गोमांस विक्रीवर बंदी नाही. गोवंश हत्येला विरोध करणार्‍यांनी नुसता गोंधळ न घालत बसता ज्या गायींना चारा मिळत नाही, त्यांची काळजी घ्यायला हवी. गायी कचरा, प्लास्टिक खाताना दिसतात. जगभरात जास्त संख्येने लोक गोमांस खातात. मग ते सगळी पापी आहेत का? असा सवालही काटजू यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र आणि हरियाणा सरकारने नुकताच गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला आहे. राष्ट्रपतींनीही त्याला मंजुरी दिली. कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, बीफ खाण्यास सरकाने बंदी घातलेली नसल्याने कायद्याचा संबंध धर्माशी जोडला जाऊ लागला आहे. साहजिकच त्यावर आता वादविवाद झडू लागले आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, राज्यातील गोवंश हत्या बंदी कायदा मागे घ्या- आठवले