आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Justice Katju Says Shazia Ilmi More Beautiful Than Kiran Bedi Make Her Cm Candidate

काटजू म्हणाले, किरण बेदींपेक्षा सुंदर आहे शाजिया, भाजपने CM उमेदवार बनवावे!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ हिला देशाचे राष्ट्रपती बनविण्याची मागणी करणारे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधिश मार्कंडेय काटजू यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. काटजूनी म्हटले आहे की, भाजपने किरण बेदीऐवजी शाजिया इल्मी यांना सीएम उमेदवार बनवायला हवे. त्यावेळी ते क्रोएशियाच्या सुंदर महिला राष्ट्रपतीचे उदाहरण द्यायला विसरले नाहीत. ज्याच्या आधारावर त्यांनी कॅटरीना कैफला देशाची राष्ट्रपती बनविण्याची मागणी केली होती.
काटजू यांनी आज टि्वट करताना म्हटले आहे की, माझे म्हणणे आहे किरण बेदींपेक्षा शाजिया इल्मी सुंदर आहे. जर शाजिया इल्मींना भाजपने सीएम उमेदवार निश्चित केले पक्ष दिल्लीत नक्कीच जिंकेल. कारण लोक सुंदर चेह-याच्या व्यक्तींना जास्त मदतान करतात जसे क्रोएशियामध्ये झाले. एवढेच नव्हे तर माझ्यासारखे जे लोक मतदान करीत नाहीत ते शाजियासाठी नक्कीच मतदान करतील.
दरम्यान, काटजू यांच्या टि्वटबाबत सोशल मिडियात तीव्र प्रतिक्रिया आल्यानंतर काटजूंनी आपण ही टि्वट मजा म्हणून केली आहेत. याबाबत टि्वट करताना काटजूंनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, काही लोकांनी माझ्या टि्वटबाबत नाराजी व्यक्त केली आहे. पण हे टि्वट मी सहज मजा म्हणून केले आहे. यातून लोकांचा सेन्स ऑफ ह्यूमर विकसित करावा हाच माझा हेतू आहे. मी ज्या अंदाजाने व मजेने हे टि्वट केले आहे तशाच चेष्टेने त्याचा स्वीकार केला पाहिजे.
काटजू यांनी यापूर्वी आधी सुंदर लोकांना उच्च पदावर बसविले पाहिजे असे मत ब्लॉगमधून व्यक्त केले होते. काटजू हे कायम आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत राहतात. त्यांनी म्हटले होते की, आर्थिकदृष्ट्या साफ कोलमडलेल्या क्रोएशियासारख्या देशाने जेव्हा सुंदर अशा मिस ग्रॅबर किटरोविक यांना आपले राष्ट्रपती बनवले आहे तर मग आपण का नाही? काटजूंनी कॅटरीना हिला राष्ट्रपती बनविण्यासाठी मात्र एक अट ठेवली होती. ती अट म्हणजे राष्ट्रपती बनल्यानंतर आपल्या शपथ ग्रहण समारंभात कॅटरीनाने आपले प्रसिद्ध गाणे 'शीला की जवानी' यावर डान्स करावा.
पुढे वाचा, काटजूंनी केलेली टि्वटस...