आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Justice Kurian Joseph Declines Invitation To Attend Dinner With Pm Modi

PMच्या डिनरला सुप्रीम कोर्टाच्या न्यायधीशांचा नकार, मोदींना दिला धर्मनिरपेक्षतेचा सल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश कुरियन जोसेफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून शनिवारी आयोजित डिनर पार्टीला उपस्थित राहाण्यास नकार दिला आहे. या डिनर पार्टीसाठी सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश, हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश आणि देशातील अनेक राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. न्यायाधीश जोसेफ यांनी एक एप्रिल रोजी लिहिलेल्या पत्रात, ख्रिश्चन समुदायाचा महत्त्वाचा सण 'ईस्टर' मुळे डिनरमध्ये सहभागी होण्यास शक्य नसल्याचे कळवले आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे, 'धार्मिक सुटीच्या दिवशी महत्त्वाच्या कार्यक्रमांचे आयोजन करायला नाही पाहिजे. दिवाळी, होळी, दसरा, ईद, बकरी ईद, ख्रिसमस ईस्टर हे ज्या त्या धर्मांसाठी महत्वाचे सण आहेत. तुम्हालाही माहित आहे, की दिवाळी, होळी, दसरा, ईद, बकरी ईद या दिवशी कोणतेही महत्त्वाचे कार्यक्रम आयोजित केले जात नाही.मला जाणिव आहे, या कार्यक्रमासाठी (डिनर आणि न्यायाधीशांची परिषद) नव्याने आयोजन करण्याची वेळ निघून गेली आहे. पण भारताच्या धर्मनिरपेक्षतेचा एक पाईक असल्याच्या नात्याने मी निवेदन करतो की, अशा महत्त्वाच्या कार्यक्रमांचे आयोजन करतानी या सणांचा सन्मान राखला गेला पाहिजे याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. मी माझी चिंता सर न्यायाधीशांकडेही व्यक्त केली आहे.'
शुक्रवारी दिल्लीत झालेल्या परिषदेत सहभागी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीशांसाठी शनिवारी पंतप्रधान निवासस्थानी डिनरचे आयोजन करण्यात आले आहे. न्यायाधीश जोसेफ यांनी शुक्रवारी आयोजित केलेल्या परिषदेवर नाराजी व्यक्त केली आहे. कारण त्या दिवशी ख्रिश्चन समुदायाचा महत्त्वाचा सण गुड फ्रायडे होता आणि रविवारी ईस्टर साजरा केला जाणार आहे.
भारताच्या धर्मनिरपेक्ष इतिहासाचाही उल्लेख
न्यायाधीश जोसेफ यांनी पंतप्रधानांना लिहिलेलेल्या पत्रात भारताच्या धर्मनिरपेक्षतेचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिले आहे, की यहुदी आणि पारशी समुदायासाठी भारत हा कायम सुरक्षीत देश राहिला आहे. इराणमध्ये ज्या पद्धतीने पारश्यांवर अत्याचार झाले आणि भेदभाव केला गेला त्यानंतर ते भारतात आले. तत्कालिन शासनकर्त्यांनी केवळ पारशी समुदायाचा स्विकार केला नाही तर त्यांचे संरक्षण देखील केले. त्यामुळेच कदाचित आज जगात सर्वाधिक पारशी हे भारतात आहेत.
भारतात सर्व धर्म समभाव
सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश जोसेफ कुरियन यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात लिहिले, 'भारतातील धर्मनिरपेक्षतेचे मॉडेल सर्व धर्म समभावावर आधारित आहे. भारत फक्त धार्मिक सहिष्णू नाही. तर येथे सर्व धर्मांना समान दर्जा आहे. महोदय, जग धार्मिक हिंसाचारात होरपळत आहे. धर्माच्या नावावर एक भाऊ दुसर्‍यावर तुटून पडत आहे. अशा काळात भारताने जगासमोर धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीत इतर देशांसमोर आदर्श ठेवला पाहिजे.'
न्यायाधीश जोसेफ सध्या कुटुंबियांसह केरळात आहेत. त्यांनी पत्रात लिहिले आहे, की गुड फ्रायडे आमच्यासाठी धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी प्रभू यशूला सुळावर लटकवण्यात आले होते. त्याच दिवशी न्यायधीशांची परिषद आयोजित केल्यामुळे मी त्यात सहभागी होऊ शकत नाही.