नवी दिल्ली- सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी देशाच्या तीन माजी सरन्यायाधीशांवर थेट आरोप केले आहेत. यूपीए सरकारच्या काळात तमिळनाडूतील द्रमुक सरकारच्या दबावापोटी एका भ्रष्ट न्यायाधीशाला मद्रास हायकोर्टाचे न्यायाधीश तर नेमलेच, शिवाय त्याला मुदतवाढही देण्यात आल्याचा खळबळजनक आरोप काटजू यांनी केला.
त्यांनी मद्रास हायकोर्टाच्या न्यायाधीशांचे नाव घेतले नाही. मात्र, ते दिवंगत न्या. अशोककुमार असल्याचे स्पष्ट होत आहे. या आरोपांनंतर सोमवारी राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. अण्णाद्रमुकसह काँग्रेसविरोधी पक्ष एकवटले. त्यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली. काँग्रेस प्रवक्ते रशीद अल्वी यांनी मात्र काटजू एनडीए सरकारशी जवळीक साधू पाहत असल्याचे म्हटले आहे.
भ्रष्टाचारावरून प्रतिष्ठा पणाला
न्या. काटजू यांच्या मते, मद्रास हायकोर्टातील एका न्यायाधीशांविरुद्ध भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होते. जिल्हा न्यायाधीश असताना मद्रास हायकोर्टातील आठ न्यायाधीशांच्या पीठाने त्यांच्यावर ताशेरे ओढले होती. मात्र, हायकोर्टाच्या माजी मुख्य न्यायमूर्तींनी या टिपणी काढल्या. वर हायकोर्टात अतिरिक्त न्यायाधीश नेमण्यात आले. एका दूरचित्रवाहिनीवरील मुलाखतीत न्या. काटजू यांनी हे प्रकरण खुलासेवार सांगितले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, काटजू यांनी कोणावर केले आरोप...