आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जस्टिस दीपक मिश्रा देशाचे पुढचे मुख्य न्यायाधीश, राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर केंद्राची घोषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जस्टिस मिश्रा देशाचे 45वे चीफ जस्टिस असतील. केंद्र सरकारने राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर ही घोषणा केली आहे. सध्याचे CJI जे.एस. खेहर 27 ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहेत. यानंतर जस्टिस मिश्रा मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम पाहतील. ते 3 ऑक्टोबर 2018 पर्यंत या पदावर राहणार आहेत.
सध्या सर्वोंच्च न्यायालयात सर्वात वरिष्ठ न्यायमूर्ती असलेल्या दीपक मिश्रा यांच्या अनेक ऐतिहासिक निकाल आहेत. यात याकूब मेमनच्या रात्रभर चाललेल्या सुनावणीनंतर त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवणे, निर्भयाच्या गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा यासह अनेक मोठे निर्णय आहेत. जस्टिस मिश्रा यांनीच देशभरातील चित्रपटगृहांत राष्ट्रगीतासाठीचा आदेश जारी केला होता.
बातम्या आणखी आहेत...