आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Juvenile Threatening Family Of Girl Whom He Ramed And Murdered

बलात्‍कार करुन मुलीचे केले होते तुकडे, अल्‍पवयीन ठरल्‍यानंतर आता देतो धमकी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- अल्‍पवयीन आरोपींच्‍या वयोमर्यादेबाबत सरकार तसेच बालन्‍यायिक मंडळाने बदल न करण्‍याचा निर्णय घेतला होता. यामागे एक विशिष्‍ठ भूमिका होती. परंतु, दिल्‍लीतील एका कुटुंबाचे यामुळे जगणे कठीण झाले आहे. 6 वर्षांच्‍या चिमुकलीची बलात्‍कार करुन निर्दयीपणे हत्‍या करणा-या एका अल्‍पवयीन आरोपीला न्‍यायालयाने मुक्त केले. आता हाच आरोपी 'मी सुटलो आहे' असे सांगून पीडित कुटुंबाला धमकी देत आहे. गंभीर बाब म्हणजे दुस-या मुलीचेही तसेच हाल करण्‍याची धमकी तो देत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले आहे.

हे कुटुंब दिल्‍लीतील रोहिणी भागात राहते. आरोपी त्‍यांच्‍या घरासमोर उभा राहून आपण तुरुंगातून बाहेर आल्‍याचे सांगतो. या आरोपीला सत्र न्‍यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. मात्र, उच्‍च न्‍यायालयाने त्‍याला अल्‍पवयीन ठरविले. त्‍यामुळे त्‍याला 3 वर्षांपेक्षा जास्‍त शिक्षा होऊ शकत नव्‍हती. त्‍याने आधीच 5 वर्षे तुरुंगात काढली होती. त्‍यामुळे उच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्णयानंतर तो तुरुंगातून बाहेर पडला. आता सर्वोच्‍च न्‍यायालयात जाण्‍याचा इरादा दिल्‍ली पोलिस व्‍यक्त करत आहेत. परंतु, मुक्त झालेला आरोपी पीडित मुलीच्‍या कुटुंबियांना रोज धमकी देऊ लागला आहे.

सविस्‍तर बातमी वाचण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईडवर...