आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • K.N.Govindacharya And AAP News In Marathi, Divyamarathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘आप’ला चांगले भविष्य; भाजपचे रणनीतिकार गोविंदाचार्यांकडून कौतुक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- एकेकाळचे भाजपचे रणनीतिकार गाोविंदाचार्य यांनी अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पार्टीचे कौतुक केले आहे. ‘आप’सारख्या नव्या पिढीतील पक्षांना देशात चांगले भविष्य आहे. परंतु त्यासाठी त्यांनी सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करावी लागेल, असे गोविंदाचार्य यांनी म्हटले आहे.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार गोविंदाचार्यांनी कुण्या एका पक्षाचे नाव घेतले नाही. परंतु त्यांचा रोख हा भाजप आणि काँग्रेस सध्या या पक्षात गांधी, लोहिया, मार्क्‍स, दीनदयाळ व इतर विचारधारेचे लोक आहेत. परंतु अशा जुन्या पक्षांचा मृत्यू हा अटळ आहे. त्यांना पर्याय देऊ शकतील, अशा पक्षांना चांगले भविष्य आहे, असे गोविंदाचार्य यांनी स्पष्ट केले.

वरुण गांधी सुलतानपूरमधून
सुलतानपूर- भाजपचे फायरब्रँड युवा नेते वरुण गांधी हे आगामी लोकसभा निवडणूक उत्तर प्रदेशातील सुलतानपूरमधून लढणार आहेत. पक्षाने अद्याप उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. परंतु वरुण यांनी त्यांच्या उमदेवारीची घोषणा आधीच करून टाकली आहे.

या मतदारसंघातील कादीपूर येथे आयोजित जाहीर सभेत वरुण यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली. सुलतानपूरमधील बाहुबली नेते माजी आमदार चंद्रभान ऊर्फ सोनू वरुण यांच्या सभेस उपस्थित होते. सर्वांना सोबत घेऊन नवे राजकारण करण्यावर आपला भर राहील, असे वरुण यांनी म्हटले आहे.