आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नॅशनल कबड्डीपटू रोहित चिल्लरला अटक, मृत पत्नीच्या ऑडिओ क्लिपने खळबळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहित कबड्डीचा गड समजल्या जाणाऱ्या दिल्लीतील निजामपूर गावचा रहिवासी आहे. - Divya Marathi
रोहित कबड्डीचा गड समजल्या जाणाऱ्या दिल्लीतील निजामपूर गावचा रहिवासी आहे.
दिल्ली/मुंबई - ललिता सुसाइड केसमध्ये दिल्ली पोलिसांनी आरोपी पती राष्ट्रीय कबड्डीपटू रोहित चिल्लरला मुंबईतून अटक केली आहे. ललिताच्या आत्महत्येनंतर चौथ्या दिवशी (शुक्रवार) तिचे सासरे स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाले होते. रोहित आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात हुंडाबळी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे.
ललिताने सोमवारी गळफास घेतला होता. त्याआधी तिने एक व्हिडिओ मॅसेज रेकॉर्ड केला होता, त्यात ससारचे लोक शारीरिक आणि मानसिक छळ करीत असल्याचा आरोप केला गेला होता.
.
रोहित म्हणाला- फक्त न्यायासाठी जिवंत आहे...
- रोहितने फेसबुवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात तो म्हणतो, 'मला विश्वास बसत नाही, माझी बावरी मला सोडून निघून गेली. मला कळत नाही तिने एवढे मोठे पाऊल का उचलले. आम्ही सोबत सात फेरे घेतले, आयुष्यभर एकमेकांसोबत राहाण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या.'

- 'मी तिचे शेवटचे दर्शनही करु शकलो नाही. मला नोकरीवरुन सुटी मिळाली नाही. यांनी मला सोडले नाही. मी कधीही हुंड्याची मागणी केली नाही, मला विश्वास आहे की माझ्या बावरीनेही असे काही म्हटले नसेल.'

- 'सासऱ्यांनाही विश्वास आहे की मी कधीही हुंडा मागितलेला नाही. मी माझ्या आयुष्यात सुखी होतो. घरात चार लोक होते, मम्मी, पापा, मी आणि माझी बावरी. मी कुठेही पळून गेलेलो नाही, मी माझ्या ड्यूटीवर आहे.'

- 'मी जिवंत आहे, कारण जगाला सत्य कळाले पाहिजे. सगळी मुलं सारखीच असतात असा विचार कोणीही करु नये. मी जिवंत आहे न्यायासाठी. यानंतर मी माझ्या बावरीकडेच जाणार आहे.'

- 'पोलिस तपासात पूर्ण सहाकार्य करणार आहे. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. मला नक्की न्याय मिळेल. मी भारतीय सैन्यात आहे, देशासाठी खेळलो होतो, कधीही चुकीचे काम करणार नाही.'

- 'जिच्यावर सर्वात जास्त प्रेम केले, तिच आयुष्यातून निघून गेली. मी देखील माझ्या बावरीकडे जाणार आहे, मलाही येथे राहायचे नाही.'

- रोहित मुंबईमध्ये नौदलात नोकरी करतो. सध्या तो प्रो कबड्डी लीगमध्ये बंगळुरु बुल्सकडून खेळतो.

काय आहे प्रकरण
दिल्लीतील नांगलोई येथे रोहितची पत्नी ललिताने (27) सोमवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
- पोलिसांच्या माहितीनुसार, ललिता डिप्रेशनमध्ये होती. कारण तिचे पहिले लग्नही हुंड्यामुळे मोडले होते.

- रोहित आणि ललिताची भेट कॉलेजमध्ये झाली होती. यावर्षी मार्चमध्ये त्यांनी लव्ह मॅरेज केले होते.

- पती आणि सासरच्या लोकांवर ललिताला मारहाण आणि हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, ऑडिओ-व्हिडिओ मॅसेजमध्ये काय म्हणाली ललिता...
पाहा, रोहित- ललिताच्या लग्नाचे फोटो
शेवटच्या स्लाइडवर ऐका ललिताचा अखेराच मॅसेज
बातम्या आणखी आहेत...