आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kailash Vijayvargiya Statement On Journalist Death

राज्यपालांना हटवून चौकशीच्या अर्जावर 9 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मध्यप्रदेशचे राज्यपाल रामनरेश यादव यांच्याविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने स्विकारली आहे. - Divya Marathi
मध्यप्रदेशचे राज्यपाल रामनरेश यादव यांच्याविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने स्विकारली आहे.
भोपाळ/नवी दिल्ली - मध्यप्रदेशातील व्यापमं घोटाळ्यात तीन दिवसांत तीन मृत्यू झाले आहे. त्यावर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना प्रत्येक मृत्यूला घोटाळ्याशी जोडणे योग्य नसल्याचे मध्यप्रदेश सरकारमधील मंत्र्याने म्हटले आहे. दुसरीकडे, मध्यप्रदेशचे राज्यपाल रामनरेश यादव यांना पदावरून हटवून त्यांच्या चौकशीला परवानगी देण्याची मागणी करणारा अर्ज सोमवारी सुप्रीम कोर्टाने दाखल करुन घेतला आहे. त्यावर 9 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. राज्यपाल रामनरेश यादव यांचा मुलगा शैलेश यादव व्यापमं घोटाळ्याचा आरोपी होता. 26 मार्च रोजी उत्तर प्रदेशात त्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता.
व्यापमं घोटाळ्याशी संबंधीत लोकांचा एका पाठोपाठ एक मृत्यू होत आहे. गेल्या तीन दिवसांत तीन जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यावरुन विरोधी पक्षाने मध्यप्रदेश सरकारला घेरले आहे. या आरोपांवर राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहाण सोमवारी म्हणाले, की प्रत्येक मृत्यूला घोटाळ्याशी जोडणे योग्य नाही.
व्यापमं घोटाळ्यासंबंधी शोध पत्रकारिता करत असलेले टीव्ही जर्नलिस्ट अक्षय सिंह यांच्या मृत्यूने अडचणीत आलेले शिवराजसिंह चौहाण सरकार त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री कैलाश विजयवर्गीय यांच्या वक्तव्याने विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे. चौहाण यांच्या उपस्थितीत रविवारी विजयवर्गीय म्हणाले, 'पत्रकार-बित्रकार सोडून द्या. पत्रकार काय आमच्यापेक्षा मोठा असतो का?' यावर चौहाण यांनी हसून दाद दिली होती.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, सोमवारी काय म्हणाले विजयवर्गीय