रामेश्वरम शाळेतील विज्ञानाचे शिक्षक सिवासुब्रम्हण्यम अय्यर सामाजिक बंडखोर वृत्तीचे होते. समाजात विषमता राहू नये, सर्वधर्म समभाव राहावा यासाठी कायम प्रयत्न करीत. अब्दुल कलाम यांच्यासोबत ते अनेक तास घालवत. कलामांना ते म्हणत, की कलाम, तुला अशा प्रकारे शिक्षित करायचे आहे, की शहरांमधील मुलांच्या तोडीने तुझा विकास व्हायला हवा.
सिवासुब्रम्हण्यम अय्यर यांनी एकदा अब्दुल कलाम यांना घरी भोजनाला बोलविले. अय्यर यांची पत्नी प्रचंड धार्मिक होती. तरीही पत्नीचा विरोध मोडून काढत त्यांनी कलाम यांना घरी जेवायला बोलवले होते. पण एक मुस्लिम मुलगा घरी जेवायला येणार या कल्पनेनेच त्यांची पत्नी प्रचंड चिडली होती. तिने कलाम यांना स्वयंपाक घरात वाढण्यास नकार दिला. पण त्यावर अय्यर गुरुजी चिडले नाहीत. त्यांनी समोरच्या खोलीत जेवणाची व्यवस्था केली. सोबत कलामांच्या शेजारी जेवायला बसले. एवढेच नाही तर स्वतःच्या हातांनी कलाम यांना भरवले. यावेळी त्यांची पत्नी स्वयंपाक खोलीतून कलाम यांच्याकडे वारंवार बघत होती. कलाम म्हणतात, मी भात कसा खातो, पाणी कसा घेतो, जेवण झाल्यावर जागा कशी स्वच्छ करतो यात त्यांच्या पत्नीला कोणताही फरक जाणवला नसेल. तरीही त्या स्वयंपाक खोलीतून निरखून बघत होत्या. त्यांच्या मनात अनेक प्रश्नांनी थैमान घातले होते.
जेवण आटोपल्यावर कलाम घरी जायला निघाले. तेव्हा अय्यर यांनी कलाम यांना त्यानंतरच्या विकेंडला पु्न्हा जेवायला बोलवले.
पुढील स्लाईडवर वाचा, त्यानंतरच्या विकेंडला काय झाले....