आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kalyan Singh, Chennamaneni Vidyasagar Rao, Mridula Sinha, Vajubhai Rudabhai Vala Appointed Governor

भाजपचे चार नेते झाले राज्यपाल; विद्यासागर महाराष्ट्राचे, तर कल्याणसिंहाकडे राजस्थान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची केंद्रात सत्ता स्थापन झाल्यापासून यूपीएच्या काळात नियुक्त राज्यपालांची उचलबांगडी आणि बदलीचे सत्र कायम ठेवत आज (मंगळवार) महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि राजस्थानच्या नव्या राज्यपालांची घोषणा करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी आंध्रप्रदेशचे भाजप नेते सी. विद्यासागर राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, उत्तर प्रदेशातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांची राजस्थानच्या राज्यपालपदी वर्णी लागली आहे. येथे यूपीएच्या काळात मार्गरेट अल्वा यांची नियुक्ती झाली होती. अल्वा यांचा कार्यकाळ या महिन्याच्या सुरवातीला संपला होता.
गुजरात विधानसभेचे सध्याचे सभापती वजूभाई वाला यांची कर्नाटकच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, भाजप महिला मोर्चाच्या नेत्या मृदूला सिन्हा यांना गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्त केले गेले आहे.
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सी. विद्यासागर राव हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत. के. शंकरनारायणन यांची शनिवारी मिझोराममध्ये बदली केल्यानंतर त्यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.