आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: येथे लागतो मांत्रिक- अघोरींचा मेळा, साधना पाहून अंगावर येतो काटा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अघोरी पूजा करणारे तांत्रिक - Divya Marathi
अघोरी पूजा करणारे तांत्रिक
नवी दिल्ली - सध्या देशभर नवरात्रीची धूम आहे. राजधानी दिल्लीसह संपूर्ण देशात देवीच्या मंदिरात आणि शक्तीपीठ स्थानकांवर भक्तांची रिघ लागली आहे. देशातील 51 शक्तीपीठांपैकी गुवाहटीच्या कामाख्या मंदिराचे सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवावे असेच आहे. इतर शक्तीपीठांपैकी सर्वात अधिक महत्व या मंदिराचे आहे. नवरात्रीमध्ये मंदिरांमध्ये तांत्रिक आणि अघोरी विद्येचाही बोलबाला आहे. यांची पूजा पाहातांना प्रथम अंगावर काटा येतो.

कामाख्या मंदिरात सर्वाधिक काळ्या जादूसाठी पुजा केल्याचे बोलले जाते. अनेक मांत्रिक कित्येक वर्षांपासून येथे साधना करत आहेत. यांची अघोरी साधना पाहून सर्वसामान्यांच्या मनात भयाची लकेर उमटते. असे नाही की फक्त पुरुष साधू आणि तांत्रिकच ही साधना करतात, महिला मांत्रिकांचाही त्यात मोठ्या प्रमाणात समावेश असतो.
जणू 'कुंभमेळा'च भरतो
मंदिरात दरवर्षी अम्बुबाची मेळा असतो. यात देशभरातील साधू आणि तांत्रिक (अघोरी विद्या करणारे) सहभागी होतात. या दरम्यान कामाख्या देवीची दररोजची पूजा होते त्यासोबतच वर्षातून एकदाच होत असलेल्या या आयोजनात काही विशेष पूजा देखील होतात. खास नवरात्रात त्या पूजा होत असतात. त्यासाठी संपूर्ण कामाख्या मंदिर सजवले जाते. या परिसरात मुख्य मंदिराशिवाय आणखी काही मंदिरे आहेत. त्यात बहुतेक सर्व देवीच्या विविध रुपांची आहेत. पाच मंदिरे भगवान शंकराची आणि तीन विष्णूची आहेत.

कामाख्याची कथा
असे म्हटले जाते की असुरांचा देव नरकासूराला माता कामाख्याची इच्छा झाली. कामाख्या आपली पत्नी असावी असे नरकासूराला वाटू लागले. कामाख्याला नरकासूराचा मृत्यू जवळ दिसू लागला. तिने त्याला सांगितले - तू एका रात्रीत जर नील पर्वतावर चारही बाजूंनी दगडांच्या पायऱ्यांचा मार्ग तयार केला आणि कामाख्या मंदिरासह त्याच्या बाजूला भव्य महाल तयार केला तर तुझ्या इच्छेनूसार मी तुझी पत्नी होण्यास तयार आहे. पण तू असे करु शकला नाही तर तुझा मृत्यू निश्चित आहे.

अहंकाराने पेटलेला दानव नरकासूर रात्रीतून कामाला लागला. त्याने नील पर्वताच्या चारही बाजूंनी मार्ग तयार केला आणि महालही पूर्ण होत आला होता. तेव्हाच देवीच्या एका मायावी कोंबड्याने बांग देऊन सकाळ झाल्याची सुचना दिली. त्यामुळे क्रोधीत झालेल्या नरकासूराने कोंबड्याचा पाठलाग केला आणि ब्रम्हपुत्रेच्या दुसऱ्या टोकाला नेऊन त्याला मारुन टाकले. नरकासुराने जिथे कोंबड्याचे प्राण घेतले त्या जागेला आजही `कुक्टाचकि' नावाने ओळखले जाते. त्यानंतर माता भगवतीकडून विष्णूने नरकासूराचा वध केला होता.

येथे भेट देणे आहे गरजेचे
कामाख्याच्या दर्शनाआधी महाभैरव उमानंद दर्शन करणे आवश्यक आहे. या टेकडीला मध्यांचल पर्वत नावाने ओळखले जाते. कारण येथेच समाधिस्थ सदाशिवाला कामदेवाने कामबाण मारुन घायाळ केले होते आणि समाधी तोडली होती. त्यानंतर भगवान शंकराने कामदेवाला भस्मसात केले होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कामाख्या मंदिर आणि मंदिरातील हटयोगींची साधन