आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Afzal Guru, Rohith Vemula Is My Icon: Kanhaiya Kumar

VIDEO : अफजल गुरू देशाचाच नागरिक होता, माझा आदर्श रोहित वेमुला : कन्हैया कुमार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ''माझा आदर्श अफजल गुरू नाही तर रोहित वेमुला आहे. अफजल गुरूबाबत विचारत असाल तर तोही भारताचा एक नागरिक होता. कायद्याने त्‍याला शिक्षा झाली. तोच कायदा अभिव्‍यक्‍ती स्‍वातंत्र देतो'', असे वक्तव्य जवाहरलाल नेहरु विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारने याने केले. विद्यापीठात शुक्रवारी झालेल्‍या पत्रकार परिषदेत तो बोलत होता.

कन्‍हैया महणाला- सरकारच्‍या सबसिडीचा विद्यापीठात योग्‍य वापर....

> प्रसार माध्‍यमे लोकाशाहीचा चौथा आधारस्‍तंत आहेत. याच लोकशाहीला बळकट करण्‍यासाठी जेएनयू संस्‍था आहे. नागरिक जे कर भरतात त्‍या करातून आमचे शिक्षण होते.
> सरकार जेएनयूसाठी जी सबसिडी देते, त्याचा योग्य वापर होत आहे.
> पण, सरकार स्वतःच्या चैनीसाठी विमानप्रवास, उच्च दर्जाच्या इमारती आणि खाण्यापिण्यासाठी सबसिडीचा वापर करते.
> त्याचा मात्र त्यांनी विचार करावा, असा टोलाही कन्हैयाने मोदी सरकारला लगावला
> माझा भारताच्या संविधानावर व न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे.
>मला जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी निवडून दिले आहे. मी कोणत्याही संघटनेचा नेता नसून, विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी आहे.
> या नात्याने त्यांचे प्रश्न सोडविणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे.
> विद्यार्थ्यांच्या हक्कासाठीच आंदोलन करण्यात आले होते व यापुढेही त्यांच्या हक्कासाठी लढणार असल्याचे कन्हैयाने स्पष्ट केले.
> डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे हे विद्यापीठ आहे.
> त्यामुळे येथील कोणताही विद्यार्थी देशद्रोही होवू शकत नाही.
> मात्र, ज्या लोकांनी आम्हाला देशद्रोही ठरविण्याचे प्रयत्न केले, त्यांचे राजकारण मोडून काढण्याचे प्रयत्न मात्र नक्की केले जातील.
> अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय? हे मला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे काय बोलायचे आणि काय नाही, हे मी समजू शकतो. अन्य लोकांनी मला ते शिकवू नये.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटो आणि पाचव्‍या स्‍लाइडवर पाहा व्‍हिडिओ...