आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kannanthanam Says That We Are Imposing The Taxes So That The Poor Have A Dignified Life

\'कार-बाइकवाले पेट्रोल खरेदी करतात, ते थोडीच भिकेला लागले\', दरवाढीवर मोदींच्या मंत्र्यांचे उत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदी मंत्रिमंडळात अल्फोन्स कन्ननथानम यांना राज्यमंत्री करण्यात आले आहे. त्यांच्याकडे पर्यटन विभागाचा स्वतंत्र प्रभार आहे. - Divya Marathi
मोदी मंत्रिमंडळात अल्फोन्स कन्ननथानम यांना राज्यमंत्री करण्यात आले आहे. त्यांच्याकडे पर्यटन विभागाचा स्वतंत्र प्रभार आहे.
नवी दिल्ली - पेट्रोल-डिझेल हे कार आणि बाइकसाठी लागते. कार आणि बाइक वापरणारे हे काही दरिद्री नाहीत. ते टॅक्स भरू शकतात. सरकार वसूल करत असेलला टॅक्स गरीबांच्या कल्याणकारी योजनांवर खर्च केला जातो, तो काही आम्ही मधल्यामधे चोरत नाही. इंधन दरवाढीवर हे उत्तर आहे मोदींच्या मंत्र्यांचे.
 
पेट्रोलच्या दराने गेल्या तीन वर्षातील उच्चांक गाठला आहे. त्यानंतरही केंद्र सरकार दैनंदिन इंधन दर पॉलिसी सुरु ठेवणार आहे. केंद्रीय मंत्री अल्फोन्स कन्ननथानम यांनी शनिवारी यावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, 'सरकार टॅक्स यासाठी लावत आहे, ज्यामुळे गरीबांना जगता येईल.'
 
कन्ननथानम म्हणाले, 'आम्ही टॅक्स यासाठी लावत आहोत, जेणे करुन गरीबांचे जीवनमान सुधारता येईल. जे लोक पैसे खर्च करु शकतात तेच पेट्रोल-डिझेल खरेदी करतात. त्यामुळे त्यांना पैसा खर्च करु द्या. आज जो काही पैसा जमा होत आहे तो आम्ही लोक चोरणार नाही. त्यामुळे जे पैसे खर्च करतात त्यांना करु द्या. उपाशी लोक तर काही पेट्रोल - डिझेल खरेदी करत नाही?'
 
प्रत्येक गावात वीज, शौचालय होणार - मंत्री 
- पेट्रोल दरवाढीचे समर्थन करताना मंत्री म्हणाले जे लोक टॅक्स देऊ शकतात त्यांच्यावरच टॅक्स लावला जात आहे. 
- ते म्हणाले, 'आम्ही येथे दबलेल्या - गरीब लोकांच्या कल्याणासाठी आहोत. आम्ही प्रत्येक गावात वीज आणि प्रत्येक घरात शौचालय तयार करु. त्यासाठी खूप पैसा लागणार आहे. त्यामुळे अशा लोकांवर टॅक्स लावत आहोत जे टॅक्स पे करु शकतात.'
 
पेट्रोल दरांचा तीन वर्षांचा उच्चांक 
 - पेट्रोल-डिझेल दरांनी तीन वर्षांचा उच्चांक गाठला आहे. बुधवारी (13 सप्टेंबर) मुंबईमध्ये पेट्रोल 79.48 रुपये आणि दिल्लीमध्ये 70.38 रुपये प्रति लीटर होते.
 - याआधी 1 ऑगस्ट 2014 मध्ये मुंबईत पेट्रोलचे दर 80.60 रुपये आणि दिल्लीत 72.51 रुपये होते. 
 - केंद्र सरकारच्या नव्या योजनेनुसार 16 जूनपासून दररोज पेट्रोल-डिझेलचे दर बदलण्याचा निर्णय झाला आहे. तेव्हापासून पेट्रोलमध्ये 7.48% आणि डिझेलमध्ये 7.76% दरवाढ झाली आहे. मात्र सरकारचे म्हणणे आहे की यात आम्ही दखल देणार नाही.  
 
पेट्रोलियम पदार्थ GST बाहेर 
 - पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीनंतर पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले होते की सरकार दरनिश्चितीची पद्धत बदलणार नाही. मात्र, आता वेळ आली आहे की जीएसटी कौन्सिल पेट्रोलियम पदार्थांनाही जीएसटी अंतर्गत आणण्याचा विचार करेल. इंधनावरील कर कपातीचा निर्णय सर्वस्वी अर्थमंत्रालयाचा राहाणार आहे. 
 - विशेष म्हणजे हे वक्तव्य तेव्हा केले गेले होते, जेव्हा केंद्र आणि राज्य सरकारांनी एक्साइज ड्यूटीच्या नावाखाली 1.13 लाक कोटी आणि तेल कंपन्यांनी 17.5 हजार कोटी रुपये वसूल केले होते.
 
पेट्रोल - डिझेल दरवाढीची तीन कारणे 
#1 - सरकारचा दावा आहे की अमेरिकेत हार्वे आणि इर्मा वादळ आल्यानंतर अंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलांच्या दरात 15% वाढ झाली. 
#2 - नजीकच्या काळात अंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलच्या दरात 18% आणि डिझेलच्या दरात 20% वाढ झाली होती. 
#3 - सप्टेंबरमध्ये भारतात क्रूडचे दर 171 रुपये प्रती बॅरल होते, म्हणेज 5% वाढ झाली होती. 
बातम्या आणखी आहेत...