आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरीवाल यांच्या विरुद्ध सीबीआयला बंद लिफाफा सुपूर्द; गैरव्यवहाराचे सबळ पुरावे - कपिल मिश्रा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर लाच घेतल्याचे आरोप लावणारे माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी मंगळवारी सकाळी पुन्हा पत्रकार परिषद बोलावली. या परिषदेत त्यांनी केजरीवाल यांच्या विरोधात सबळ पुरावे असल्याचा दावा केला. यासोबत, नवीन आरोपांचे पुरावे आणि खुलासा केवळ सीबीआयपुढे मांडणार असे स्पष्ट केले. 
 
बंद लिफाफ्यात सीबीआयला दिले पुरावे
मिश्रा मंगळवारी यांनी सीबीआय कार्यालयास जाऊन एक बंद लिफाफा दिला. यात कथित पुराव्यांची कागदपत्रे होती. सीबीआयमध्ये त्यांनी 3 तक्रारी सुद्धा दाखल केल्या आहेत. 
 
3 एफआयआर दाखल करणार - मिश्रा
तत्पूर्वी  मिश्रा यांनी ट्वीट करून 3 एफआयआर दाखल करणार असे सांगितले.
- पहिला एफआयआर केजरीवाल आणि सत्येंद्र जैन यांच्यातील कथित 2 कोटींच्या व्यवहारांवर, - दुसरे एफआयआर केजरीवालांच्या नातेवाईकांना जमीन मिळवून दिल्याबद्दल जैन यांच्या विरोधात असणार आहे.
- तिसरे एफआयआर सत्येंद्र जैन, आशिष खेतान, राघव चंद्रा, संजय सिंह आणि दुर्गेश पाठक यांच्या विरोधात फाडला जाणार आहे. या लोकांनी परदेशवारीसाठी चुकीच्या पद्धतीने निधी वापरला असा आरोप मिश्रा यांनी लावला आहे. 
 
कपिल मिश्रा आपमधून निलंबित
अरविंद केजरीवाल यांनी वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी संध्याकाळी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली. याच बैठकीत मिश्रा यांना शिस्तभंग केल्याच्या आरोपावरून पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. 
 
पुढील स्लाईड्सवर वाचा... काय आहे प्रकरण..?
बातम्या आणखी आहेत...