आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वास यांचे निकटवर्तीय कपिल मिश्रा यांना हटवले, रविवारी गौप्यस्फोट करणार: मिश्रांचा दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- महापालिकेतील पराभवानंतर आम आदमी पार्टीतील अंतर्गत संघर्ष वाढत चालला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी मंत्री कपिल मिश्रा यांना पदावरून हटवले. त्यांच्याकडे जल,पर्यटन व सांस्कृतिक विभागाची जबाबदारी होती. ते कुमार विश्वास यांचे निकटवर्तीय मानले जातात.

मिश्रा यांच्या जागी नजफगडचे आमदार कैलाश गहलोत यांना मंत्रिपद देण्यात येणार आहे. सीमा पुरीचे आमदार राजेंद्र पाल गौतम देखील मंत्री होतील. दरम्यान रविवारी गौप्यस्फोट करणार असल्याचे दोन ट्विट कपिल मिश्रा यांनी केले. भ्रष्टाचाराच्या विरोधात खुली लढाई रविवारी सकाळी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. केजरीवाल यांना भ्रष्टाचाराशी संबंंधित अत्यंत महत्वाची तथ्ये दिली आहेत. ते रविवारी जाहीर केले जातील, असे मिश्रा यांनी त्यातून स्पष्ट केले. मिश्रा यांना मंत्रिपदावरून हटवण्यात आल्यानंतर लगेच कुमार विश्वास यांनी पक्षात सारे काही आलबेल नसल्याचे संकेत दिले. 
 
भ्रष्टाचाराच्या विरोधात आत आणि बाहेर आमचा संघर्ष सुरुच ठेवू. याबद्दल मला देश व कार्यकर्त्यांना आश्वस्त करायचे आहे, असे कुमार यांनी ट्विट करून सांगितले.
बातम्या आणखी आहेत...