आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिल मिश्रांचे अरविंद केजरीवाल यांना चौथे पत्र, आज गौप्यस्फोट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीचे माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शनिवारी चौथे पत्र पाठवले. रविवारी त्यांच्या केजरीवाल यांच्या विरोधात मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा मिश्रा यांनी दिला आहे. आप नेत्यांच्या परदेश दाैऱ्याची माहिती जाहीर करण्याच्या मागणीसाठी उपोषणावर बसले आहेत.  

ट्विट करून मिश्रा म्हणाले, सत्याग्रहाचा आजचा चौथा दिवस आहे. परदेश दौऱ्याच्या मुद्यावरून लक्ष इतरत्र वळवण्यासाठी तुम्ही आणखी कोणते नाटक करणार आहात. दुसरीकडे कपिल मिश्रा यांच्या विरोधात बुराडीचे आप आमदार संजीव झा यांनी मोर्चा उघडला आहे. झा यांनी मिश्रांच्या घराबाहेर उपाेषणाची घोषणा केली होती. पोलिसांकडून लेखी परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे झा यांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

झा यांनी मिश्रा यांना पत्र लिहिले. तुमच्या कारनाम्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांत तीव्र संताप व निराशा आहे, असे झा यांनी म्हटले आहे. त्यावर मिश्रा म्हणाले, प्रसारमाध्यमातूनच तुमच्या पत्राबद्दल समजले. चोर आपल्या विरोधातील पुरावे त्याच्याकडे सोपवण्याची मागणी करू लागला आहे. पुढे तोच न्यायाधीश, वकील व साक्षीदार होऊन स्वत:ला निर्दोष म्हणून सिद्ध करेल. तुम्हाला या गोष्टी कराव्या लागत आहेत, ही तडजोड मी समजू शकतो, असा उपहास मिश्रा यांनी आपल्या पत्रातून केला आहे. मीदेखील केजरीवाल यांच्यावर विश्वास ठेवत होतो. आता नाही. 
बातम्या आणखी आहेत...