आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दीदी’ आणि ‘अम्मां’च्या दुराव्याने सिब्बल चिंतेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या विविध कार्यक्रमांमुळे पश्चिम बंगाल तसेच तामिळनाडू यांच्याशी वाढत असलेल्या दुराव्याबाबत केंद्रीय दूरसंचारमंत्री कपिल सिब्बल यांनी चिंता व्यक्त केली आहे. राज्य सरकारच्या सहकार्याने राबवण्याच्या कार्यक्रमांना राज्य सरकारांची अनुपस्थिती ही चिंतेची बाब असल्याचे सिब्बल यांनी म्हटले आहे. केंद्र आणि राज्यात निरनिराळ्या पक्षांची सरकारे असल्याने धोरणात एकमत नसणे साहजिक आहे, पण लोकोपयोगी योजनांवर याचा परिणाम होऊ नये, असे सिब्बल म्हणाले. देशभरात ऑप्टिकल फायबरचे जाळे टाकण्यासाठी दूरसंचार मंत्रालयाने भारत ब्रॉडबँड नेटवर्क आणि राज्य सरकारांसोबत त्रिपक्षीय करार केला आहे. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, आसाम, बिहार, हिमाचल प्रदेश, आदी राज्यांचा समावेश आहे. या कार्यक्रमात पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यांच्या अनुपस्थितीबाबत सिब्बल बोलत होते. आकारमान तसेच सीमेलगत असल्याने या राज्यांचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे अशा योजनांसंदर्भात या राज्यांनी केंद्रासोबत एक धोरण निश्चित करणे आवश्यक असल्याचे सिब्बल यांनी म्हटले आहे.

त्रिपक्षीय करार केलेली ऑप्टिकल फायबर अंथरण्याच्या कामात दूरसंचार मंत्रालयास सहकार्य करतील. डिसेंबर 2013 पर्यंत देशातील 2.5 लाख गावे ब्रॉडबँडने जोडण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट एक लाखावर आणण्याचा दूरसंचार मंत्रालयाचा विचार आहे. केंद्र शासन देशात नवे तंत्रज्ञान आणू पाहत असताना, राज्य सरकारे जर मागे हटली, तर तेथील जनता नवे तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक सुविधांपासून वंचित राहील, असे सिब्बल म्हणाले.