आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वच विरोधी कलंकित? सिब्बल यांचा केंद्राला प्रश्न, लालूंच्‍या घरावरील CBI छाप्याने खळबळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भाजप आणि आघाडीतील भागीदार पक्ष तेवढे  स्वच्छ आणि विरोधी पक्ष सरसकट कलंकित आहेत का? असा प्रश्न काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी विचारला आहे. राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या घरावरील सीबीआय छाप्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.  
 
तपास संस्थांनी राजद प्रमुख व त्यांच्या नातेवाइकांवर कारवाई केली. त्यात मिळालेल्या माहितीचा तपशील मात्र अद्याप जाहीर झालेला नाही. सीबीआयने टाकलेले छापे आणि ठपका याबाबत मला पुरेशी माहिती नाही. परंतु मला या सरकारला एक प्रश्न विचारावासा वाटतो. भाजप तेवढा स्वच्छ पक्ष आहे आणि उर्वरित विरोधी पक्ष मात्र कलंकित आहेत, असे सरकारला वाटते का? पाटण्यातील कारवाईवरून तरी तसे वाटते. आम्ही सर्व कलंकित आहोत, असे कारवाईवरून वाटू लागले आहे. माझ्या छोट्या प्रश्नाचे उत्तर सरकारने दिल्यास चांगले होईल, असे सिब्बल म्हणाले.  
 
चार शहरांत झाली कारवाई
लालू यांच्यासह त्यांची पत्नी राबडीदेवी, मुलगा तेजस्वी हे आरोपी आहेत. सक्तवसुली संचालनालयाने दिल्लीत तीन ठिकाणी छापे टाकले होते. लालूंची मुलगी मिसा भारती यांच्या फार्महाऊसवर हे छापे टाकण्यात आले. त्यात मनी लाँडरिंगचा आरोप आहे. सीबीआय व ईडीने भ्रष्टाचार प्रकरणात चार शहरांत छापे टाकले होते. त्यामुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कंत्राटाचा आरोप  
लालू यादव रेल्वेमंत्री असताना त्यांनी आयआरसीटीसीच्या हॉटेलच्या देखभाल-दुरुस्तीच्या कंत्राटामध्ये अधिकाराचा गैरवापर केला होता. त्यांच्या मर्जीतील लोकांना कंत्राट देण्यात आले होते. दोन हॉटेलच्या देखभालीत हा घोटाळा करण्यात आला होता, असा आरोप त्यांच्यावर आहे. यूपीए सरकारच्या काळात ते रेल्वेमंत्री असताना हा घोटाळा केला होता, असा आरोप आहे. 
बातम्या आणखी आहेत...