आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करिना कपूरने कुटुंबप्रमुख म्हणून मिळवले रेशन कार्ड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुडगाव - हरियाणातील पतोडी येथील अन्न पुरवठा विभागाने सैफ अली खानने रेशन कार्डसाठी केलेला अर्ज नाकारला होता; परंतु त्याची पत्नी व अभिनेत्री करिना कपूरने घरची कुटुंबप्रमुख म्हणून अर्ज करताच खान दांपत्याला रेशन कार्ड देण्यात आले आहे. सैफ अलीकडे पुरेशी कागदपत्रे नसल्याने त्याचा अर्ज फेटाळला होता. करिनाकडे सर्व कागदपत्रे होती. त्यामुळे तिला लगेच कार्ड मिळाले, असे िवभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

सैफ अली खानने २०१५ मध्ये रेशन कार्डसाठी अर्ज केला होता; परंतु त्याच्याकडे पुरेशी कागदपत्रे नसल्याने त्याला कार्ड मिळाले नाही. तसेच त्याला कुटुंबप्रमुख होता आले नव्हते. परंतु सैफचे नाव या कार्डमध्ये सदस्य म्हणून समाविष्ट करण्यासाठी विभागाने तशा प्रकारचे अंडरटेकिंग घेण्यासही पुरवठा विभागाने मान्यता दिली. सैफने त्याच्या अंडरटेेकिंगमध्ये म्हटले आहे की, आपले भारतात कुठेही रेशन कार्ड नाही. त्यामुळे आपले नाव यात समाविष्ट करण्यात यावे. करिना कपूरने मात्र मुंबईच्या अन्न पुरवठा विभागातून कपूर नावाने मिळालेल्या शिधात्रिकेमधून तिचे नाव वगळण्याची प्रक्रिया पूर्ण केली. त्याचे प्रमाणपत्र जोडल्यानंतर त्याआधारे नवे रेशनकार्ड तयार करण्यासाठी अर्ज केला. त्यात करिनाला कुटुंबप्रमुख म्हणून उल्लेखित करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...