आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kareenas Morphed Photo Used As Warning Against Love Jihad

दुर्गा वाहिनीच्या LOVE JIHAD विरोधी मॅगझीनच्या कव्हरवर करिना कपूरचा फोटो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विश्व हिंदू परिषदेची महिला शाखा असलेल्या दुर्गा वाहिनीने तथाकथित लव्ह जिहादच्या विरोधात जागरुकतेसाठी बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूरचा फोटो वापरला आहे. या संघटनेने मॅगझीनच्या कव्हर पेजवर करिनाचा फोटो छापला छापला असून, त्या माध्यमातून लव्ह जिहादच्या विरोधात हिंदू महिलांना जागरूक करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.
दुर्गा वाहिनीच्या उत्तर भारतातील प्रादेशिक रजनी ठुकराल यांनी त्यांचे मॅगझीन 'हिमालय ध्वनी' मध्ये करिना कपूरचा फोटो वापरून लव्ह जिहादच्या विरोधात आवाज उठवला आहे. कव्हरवर करिनाचा अर्धा चेहरा हिंदु महिलेचा असून तिच्या भांगेत सिंदूर दाखवण्यात आला आहे. तर उर्वरित अर्ध्या चेह-यावर बुरखा दाखवण्यात आला आहे. हा फोटो मॅगझीनच्या कव्हरवर छापण्यात आला आहे. या मासिकाचा लव्ह जिहादवरील विशेषांक आहे.
'धर्मांतरण से राष्ट्रांतरण...।' असा मजकूर करिना च्या फोटोखाली छापण्यात आला आहे. करिना कपूरने प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्याशी विवाह केला आहे. सैफने अशाप्रकारे करिना फोटो छापल्याने नाराजी व्यक्त केली आहे. असे करून मध्ययुगाप्रमाणेच मानसिकता असल्याचे सिद्ध केले असल्याचे सैफ म्हणाला.
दुसरीकडे रजनी यांनी या फोटोचे समर्थन करताना सांगितले की, करिना एक सेलेब्रिटी आहे. मोठ्या प्रमाणावर तरुण हे सेलब्रिटींचे अनुकरण करत असतात. जर करिना असे करत असेल, तर आपण का करू नये? अशी तरुणींची मानसिकता तयार होऊ शकते. आपल्या अभियानाबाबत बोलताना ठुकराल म्हणाल्या की, मुस्लिमांशी विवाह करणा-या 16 महिलांशी घर वापसीसाठी संपर्क केला असून, त्यापैकी दोघींची घरवापसी केली असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यापैकी एकिचा परत विवाहदेखिल झाला असल्याचे त्या म्हणाल्या.
विश्व हिंदु परिषदेची महिला शाखा असलेल्या दुर्गा वाहिनीद्वारे मुस्लिम पुरुषांशी विवाह केलेल्या महिलांच्या घर वापसीसाठी प्रयत्न केले जात आहेत. लव्ह जिहादचा अंत केल्याशिवाय घर वापसी अभियान यशस्वी होऊ शकत नाही, असे दुर्गा वाहिनी संघटनेचे म्हणणे आहे.