आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारगिल शहिदाच्या मुलीच्या पोस्टवर वीरुने काढला चिमटा- \'मी नव्हे बॅटने लगावले शतक\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एबीव्हीपीविरोधात सोशल मीडियावर रान उठवत असलेल्या कारगील शहीदाच्या मुलीला वीरेंद्र सहेवागने त्याच्या स्टाइलने चिमटा काढला आहे. गुरमेहरने ट्विटवर एक फोटो पोस्ट केला आहे. एक कार्ड हातात घेऊन असलेल्या गुरमेहरने म्हटले आहे, की माझ्या वडिलांना पाकिस्तानने नाही तर वॉरने मारले आहे. त्यावर सहवागनेही ट्विटरवर तशाच अंदाजात फोटो पोस्ट केला आहे. त्याच्या हातातील कार्डवर लिहिले आहे, 'दोन त्रिशतके मी नाही झळकवली , हे तर माझ्या बॅटने केले आहे.' दुसरीकडे गुरमेहरने एबीव्हीपीकडून बलात्काराच्या धमक्या येत असल्याचा आरोप केला आहे. गुरमेहर दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेजची विद्यार्थीनी आहे. दरम्यान, मी अशा धमक्यांना घाबरत नाही असेही ती म्हणाली आहे.
 
ABVP विरोधात सोशल मीडियावर सुरु केली मोहिम 
- मीडिया रिपोर्टनुसार, गुरमेहरने एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत बलात्काराची धमकी दिली जात असल्याचा आरोप केला आहे. 
- गुरमेहर कौर म्हणाली, 'सोशल मीडियावर मला धमकीचे अनेक मेसेज येत आहेत. लोक हिंसेवर उतरतात आणि बलात्काराची धमकी देतात हे अतिशय भयभीत करणारे आहे. राष्ट्रवादाच्या नावावर बलात्काराची धमकी देणे योग्य नाही.' 
- 'एबीव्हीपीविरोधात मी घेतलेल्या भूमिकेने नाराज झालेले लोक माझ्या मैत्रिणींनाही रेपची धमकी देत आहेत. मला अँटी-नॅशनल ठरवले जात आहे'. 
 
काय आहे प्रकरण 
- दिल्लीतील रामजस कॉलेजमध्ये मागील आठवड्यात एबीव्हीपी आणि एआयएसएफ समर्थकांमध्ये हाणामारी झाली होती. 
- येथे आयोजित सेमिनारला एबीव्हीपीने देशविरोधी असल्याचे सांगत विरोध केला होता. 
- त्यानंतर पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठीतही एबीव्हीपी आणि एसएफआय आमने-सामने आले होते.
- येथे भाजपच्या मदतीने विधानपरिषदेवर गेलेले आमदार प्रशांत परिचारकांच्या विधानावरुन वादंग झाला होता.
- या हिंसाचाराचा गुरमेहरने विरोध केला होता. 22 फेब्रुवारीला गुरमेहरने तिचे फेसबुक प्रोफाइल पिक्चर बदलले होते. हातात कार्ड असलेला फोटो पोस्ट केला होता. त्यावर #StudentsAgainstABVP हॅशटॅगसह लिहिले होते, 'मी दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेते. ABVP ला घाबरत नाही. मी एकटी नाही, संपूर्ण देशातील विद्यार्थी माझ्यासोबत आहे.'
- गुरमेहरने पोस्टमध्ये लिहिले होते, 'एबीव्हीपीने केलेला हल्ला हा विचारांवर हल्ला आहे. लोकशाहीवर हल्ला आहे. हे थांबले पाहिजे. हा केवळ आंदोलकांवर हल्ला नाही तर प्रत्येक भारतीयाच्या मनात असलेल्या लोकशाही विचारांवर हल्ला आहे.'
- गुरमेहरने लिहिले होते, 'अभाविपने विद्यार्थ्यांवर केलेला हल्ला हा लोकशाही व स्वातंत्र्यावरील हल्ला आहे. त्याला आवर घातला पाहिजे. आमच्यावर फेकलेला प्रत्येक दगड आम्हाला जखमी करू शकतो. मात्र आमच्या इच्छाशक्तीला नव्हे.'
 
गुरमेहरचे कँपेन सोशल मीडियामध्ये चर्चेचा विषय 
- गुरमेहरने 22 फेब्रुवारीला पोस्ट शेअर केली होती. तिच्यासोबतच्या विद्यार्थ्यांनी ती शेअर केली होती.
- पोस्ट व्हायरल झाल्यानंतर देशभरातील अनेक विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी असेच कार्ड हातात घेतलेले फोटो प्रोफाइल पिक्चर म्हणून ठेवले आहेत. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...