आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबांच्या मृत्यूला पाक नाही युद्ध जबाबदार; कारगिलमधील शहीद जवानाच्या कन्येचा संदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- 1999 मध्ये झालेल्या कारगील युद्धात अनेक भारतीय जवानांना वीरमरण आले. त्यात कॅप्टन मनदीप सिंग यांचाही समावेश होता. युद्धानंतर अनेक भारतीयांनी पाकिस्तानचा तिरस्कार केला. मात्र, शहीद मनदीप सिंग यांच्या 19 वर्षीय कन्या गुरमेहर कौर हिने एक भावनात्मक आवाहन केले आहे.

गुरमेहरने फेसबुकवर चार मिनिटांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामधून तिने शांततेचा संदेश दिला आहे. उल्लेखनिय म्हणजे गुरमेहरने एकही शब्द न बोलता प्लेकार्डच्या माध्यमातून आपला संदेश जगापर्यंत पोहोचवला आहे. भारत-पाकमध्ये शांतता राहावी, यासाठी दोन्ही देशांच्या सरकारने चर्चा करुन तोडगा काढावा, असे म्हटले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, बाबांच्या मृत्यूला पाकिस्तान नाही युद्ध जबाबदार...

बातम्या आणखी आहेत...