आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगाव स्फोटातील आरोपी कर्नल पुरोहितचा जामिनासाठी अर्ज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मालेगाव स्फोटातील एक आरोपी कर्नल श्रीकांत पुरोहित यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली. मुंबई उच्च न्यायालयाने २५ एप्रिल रोजी त्यांची जामीन याचिका फेटाळली होती. तथापि, या खटल्यातील दुसऱ्या आरोपी साध्वी प्रज्ञा यांना जामीन दिलेला होता. त्यांनी समानतेच्या आधारावर जामीन मागितला आहे.  सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांनी याचिकेवर तत्काळ सुनावणीचा कर्नल पुरोहित यांचा आग्रह फेटाळून लावला. नियमित रूपाने नंबर आल्यावरच सुनावणी होईल.
बातम्या आणखी आहेत...