आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Karnataka Assembly Elections To Be Held On May 5

रणशिंग विधानसभेचे : कर्नाटकात 5 मे रोजी निवडणूक तर 8 मे ला मतमोजणी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- कर्नाटक विधानसभेसाठी निवडणूक 5 मे रोजी होणार असून, मतमोजणी 8 मे रोजी होणार आहे. 244 जागांसाठी 10 एप्रिल रोजी अधिसूचना जारी होईल. मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.एस. संपत यांनी बुधवारी ही घोषणा केली. 17 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 18 एप्रिल रोजी त्यांची छाननी होईल. 20 एप्रिलपर्यंत नावे मागे घेता येतील.

राज्यात बुधवारपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यात 4.18 कोटी मतदारांसाठी 50,446 मतदान केंद्रे उभारली जातील. राज्यात 36 जागा अनुसूचित जाती आणि 15 जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. तीन वर्षांपासून एकाच जिल्हय़ात कार्यरत अधिकर्‍यांना हटवण्यात येईल. कोणत्याही अधिकार्‍याला आपल्या गृहजिल्हय़ात पोस्टिंग न देण्याच्या सूचना आहेत. राज्यातील भाजपचे मुख्यमंत्री जगदीश शेट्टार सरकारचा कार्यकाळ 3 जून रोजी संपत आहे.