आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीर, महागाई, महिला सुरक्षेत अपयशी; तरीही 77% जनता मोदींसोबत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिव्य मराठी नेटवर्क - सर्वेक्षणातून अनेक आश्चर्यकारक तथ्ये बाहेर आली आहेत. मोदी हे युवकांचे आवडते नेते म्हणून ओळखले जात होते. पण, नव्या तथ्यांनी ही धारणा बदलून टाकली आहे. ते युवकांसाेबत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्येही तितकेच लोकप्रिय आहेत.  
 
आकडेवारीच्या दृष्टिकोनातून बघितले तर लक्षात येईल की, सर्व्हेतील 79% महिलांनी मोदींना 6 किंवा त्यापेेक्षा अधिक गुण दिले आहेत. तर, 77% ज्येष्ठ नागरिकही मोदींचे निर्णय आणि कामकाजासोबत आहेत. ही स्थिती मोदींच्या बाजूंनी जाण्याचे कारण म्हणजे आगामी काळात ज्या दहा राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत त्या राज्यांतील 79% लोकांनीही मोदींना दहापैकी सहा गुण दिले आहेत. शहरांपेक्षा ग्रामीण भागातील लोक नोटाबंदीचे समर्थन करत आहेत. आकडेवारीवरूनही हेच दिसून येते. कारण, ज्यांनी सरकारला महागाई, भ्रष्टाचार आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून अपयशी ठरवले त्यांनीच समग्र कामकाजाबाबत चांगले गुण दिले आहेत. काही राज्यांमध्ये सर्जिकल स्ट्राइक चर्चेचा मुद्दा ठरला. तर, दक्षिणेत आधार कार्डचा मुद्दा अग्रस्थानी राहिला. त्याचप्रमाणे रेल्वेतील लवचिक भाडे पद्धतीलाही दुसऱ्या क्रमांकाची पसंती दिली आहे.  
 
भास्कर सर्वेक्षणातील एक प्रश्न मोदींच्या संवाद साधण्याच्या शैलीवर आधारित होता. राम मंदिर, कत्तलखान्यांसारख्या वादांशी संबंधित उत्तर प्रदेशच्या बहुतांश लोकांच्या मते, वादग्रस्त मुद्द्यांवर मोदी नेहमीच गप्प असतात. दरम्यान, आगामी काळात विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या दहा राज्यांमधील 58% मतदार मोदींच्या बाजूने आहेत. ही त्या लोकांची आकडेवारी आहे जे मानतात की, आताच्या घडीला निवडणुका झाल्यास मोदी 2014 पेक्षाही अधिक जागांनी जिंकतील.  जी कामे नवीन आणि परंपरागत सुधारणांपेक्षा वेगळी होती, त्याच कामांची लोकांनी भरभरून स्तुती केल्याचे या सर्वेक्षणातून दिसून आले. हे सर्वेक्षण फक्त सरकारबाबत नव्हते, तर यातून विरोधी पक्षाची ताकदही जाणून घ्यायची होती. मात्र, सर्वेक्षणात बहुतांश लोकांनी म्हटले की, विरोधी पक्ष कमकुवत वाटत असल्यामुळेच सरकारच्या उणिवा समोर आणण्यात अपयशी ठरत आहे. त्यांच्यासाठी चिंतेची बाब हीच आहे की, आगामी काळात ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत त्या राज्यांमधील 83% लोक असा विचार करतात.  

- 29 राज्ये, 492 जिल्हे, 1328 शहरे आणि 433 गावांमध्ये मोदींच्या कामकाजाबाबत विचारण्यात आले प्रश्न 
बातम्या आणखी आहेत...