आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मिर आता रणमैदान होत चालले, याला फक्त नरेंद्र मोदी-मेहबूबा मुफ्ती जबाबदार - काँग्रेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एप्रिल महिन्यात मेहबूबा मुफ्ती यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेत काश्मीरमधील स्थितीबाबत चर्चा केली होती. - Divya Marathi
एप्रिल महिन्यात मेहबूबा मुफ्ती यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेत काश्मीरमधील स्थितीबाबत चर्चा केली होती.
नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याविषयी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी दिलेल्या वक्तव्यावर काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काँग्रेस नेते शकील अहमद यांनी काश्मीरला युध्दाचे मैदान करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. यासाठी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मेहबूबा मुफ्ती जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भाजप-पीडीपीच्या कार्यकाळात बिघडली काश्मीरमधील स्थिती

- काँग्रेस नेते शकील अहमद म्हणाले, राज्यातील स्थितीसाठी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन लोक जबाबदार आहेत. भाजप-पीडीपीचे सरकार बनल्यापासून काश्मीर ही युध्दभूमी झाली आहे.

बंदूक आणि सैन्याने शांतता नांदणार नाही

- तत्पूर्वी शनिवारी मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या होत्या की, आमचे सैनिक शहीद होत आहेत. काश्मीरमध्ये बंदूक आणि सैन्य दोन्ही शांतता आणू शकत नाहीत.
- काँग्रेस नेते मीम अफजल यांनी वक्तव्याचे समर्थन करताना सरकारनेच शांतता प्रस्थापित करण्यासाठी काही तरी तोडगा काढावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

अनंतनाग येथील घटनेनंतर केले होते मेहबूबा मुफ्ती यांनी वक्तव्य

- अनंतनाग जिल्ह्यात दहशतवादी हल्ल्यात सहा पोलिस शहीद झाले होते. त्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी हे वक्तव्य केले होते.
- जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी पळून जाण्यापूर्वी या जवानांचे चेहरे विद्रूप केले होते.
- गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या जीपवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. 
- लष्कर-ए-तोयबाने या घटनेची जबाबदारी स्वीकारली होती.