आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kashmir Minister Get Money Through Military, V.K. Singh

काश्मीरमधील मंत्र्यांना मिळतो लष्करातून पैसा, व्ही. के. सिंह यांचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीर सरकारमधील मंत्र्यांना भारतीय लष्करामार्फत पैसा पुरवला जात असल्याचा दावा करून माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांनी खळबळ उडवून दिली. राज्यात स्थिर सरकार राहावे म्हणून स्वातंत्र्य मिळाल्यापासून हा प्रकार सुरू असल्याचेही ते म्हणाले.


एका वृत्तवाहिनीशी बोलताना सिंह म्हणाले, ‘काश्मीर प्रीमियर लीगची सुरुवात कशी झाली?, पैसा आला कुठून? राज्य सरकार किंवा मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांनी थोडीच पैसे दिले? हा पैसा लष्कराकडूनच गेला. काश्मीरबद्दलचे धोरणच पूर्ण वेगळे आहे.’ मुख्यमंत्री अब्दुल्ला यांनाही हा प्रकार माहीत असल्याचा दावा सिंह यांनी केला. कोणत्या मंत्र्यांना आणि लोकांना पैसे दिले जातात याचा खुलासा त्यांनी केला नाही. नेमके कोणाला किती पैसे दिले याबद्दलही सिंह यांनी काही सांगितलेले नाही.


दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते देवेंद्रसिंह राणा यांनी सिंह यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेत त्यांनी मंत्र्यांची नावे जाहीर करावीत, असे आवाहन केले. पैसे घेणा-यांपैकी कोणीही विद्यमान सरकारमध्ये मंत्री असेल तर मुख्यमंत्री त्यांना तत्काळ बडतर्फ करतील, असेही राणा यांनी म्हटले आहे.