आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

J&K : दहशतवाद्यांचे फायरिंग, काल थांबलेली चकमक सकाळी पुन्हा सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या दक्षिण भागात असलेल्या कुलगाममध्ये रविवारी सायंकाळी भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये सोमवारी सकाळी पुन्हा चकमक सुरू झाली आहे. सकाळीच दहशतवाद्यांनी पुन्हा फायरिंग केल्याची माहिती मिळाली आहे. कुलगाममध्ये लश्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी लपलेले असून ते काल सायंकाळपासून लपून फायरिंग करत असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

आर्मीचे सर्च ऑपरेशन
सोमवारी सकाळपासूनच आर्मीच्या जवानांनी कुलगाम जिल्ह्याच्या रेडवानी परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. याच परिसरातील एका इमारतीमध्ये लश्करचे दोन दहशतवादी लपलेले असल्याची शक्यता असल्याची माहिती जवानांना मिळाली आहे. सर्च ऑपरेशनमध्ये लष्कर, सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांचे जवान व्यस्त आहेत.

लिंक मॅनला भेटण्यासाठी आले दहशतवादी
दहशतवादी रेडवानी परिसरात लिंक मॅनला भेटण्यासाठी अाले होते, अशी माहिती मिळाली आहे. रविवारी आर्मीच्या जवानांना याची माहिती मिळाली होती. त्यानंतर जवानांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला. दहशतवाद्यांनी फायरिंग करत पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चकमक झाली.

नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले
फायरिंग सुरू होताच जवानांनी सर्वात आधी परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली. सर्वांना दूर सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आले. त्यानंतर रात्री आठ वाजता पुन्हा फायरींग सुरू झाली. मध्यरात्रीनंतर परिसरातील लोकांची सुरक्षा लक्षात घेता जवानांनी फायरिंग बंक केली. त्यानंतर सोमवारी सकाळी जवानांनी पुन्हा मोर्चा सांभाळला.
बातम्या आणखी आहेत...