आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक उच्चायुक्तालयाची ईद मिलन पार्टी, केवळ एक फुटीरतावादी नेता उपस्थित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाच्या ईद मिलन पार्टीत अब्दुल बसीत आणि फुटीरतावादी नेता मीर वाइज फारुक. - Divya Marathi
मंगळवारी पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाच्या ईद मिलन पार्टीत अब्दुल बसीत आणि फुटीरतावादी नेता मीर वाइज फारुक.
नवी दिल्ली - पाकिस्तान उच्चायुक्तालयाने मंगळवारी ईद मिलन पार्टीचे आयोजन केले होते. मात्र अनेक काश्मिरी फुटीरतावादी नेत्यांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला. अब्दुल बसित यांनी दिल्ली येथील या ईद मिलनसाठी 200 जणांना आमंत्रित केले होते. व्हॉट्स अप, मेल आणि पत्राद्वारे पाठवलेल्या या आमंत्रणामध्ये बहुतांश फुटीरतावादी नेत्यांना आमंत्रण दिले होते. पण ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही. मीरवाइज उमर फारुक वगळता एकही फुटीरतावादी नेता या पार्टीसाठी आला नव्हता.

नेत्यांच्या अनुपस्थितीचे कारण
पाकिस्तान उच्चायुक्तालय नवी दिल्लीमध्ये इफ्तार पार्टीत मुस्लीम समुदायाच्या लोकांना आमंत्रित करते. त्यात काश्मीरच्या फुटीरतावाद्यांचा सर्वाधिक सहभाग असतो. यावर्षी मात्र इफ्तारचे आयोजन करण्यात आले नव्हते. सात वर्षांमध्ये प्रथमच पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाने ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पण रशियात मोदी आणि शरीफ यांच्या भेटीनंतर करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनामध्ये काश्मीरच्या मुद्याचा उल्लेख नसल्याने फुटीरतावादी नेत्यांमध्ये नाराजी होती.

काय म्हणाले बासीत...
या वेळी पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसीत म्हणाले की, दोन्ही देशांनी वादासाठी नव्हे तर सहकार्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. ते म्हणाले, संबंध सुधारले जावे अशी आमची इच्छा आहे. आपल्यामध्ये गेल्या 67 वर्षांपासून वाद आहे. पण आता संघर्ष सोडून सहकार्याबाबत विचार करायला हवा. ते शक्य व्हावे यासाठी आम्ही प्रार्थना करू. काश्मीरसह सर्व वादग्रस्त मुद्यांवर चर्चेतून तोडगा काढला जाईल, असेही बासीत म्हणाले. पाच दिवसांपूर्वीच परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी इस्लामाबादला इशारा दिला होता. सीमेपलिकडील दहशतवाद आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असे जयशंकर म्हणाले होते.

काय होता मेन्यू
उच्चायुक्तालयाच्या पार्किंग स्लॉटमध्ये आयोजित ईद मिलन कार्यक्रमामध्ये मेन्यूत सीक कबाब, मलाई टिका आणि शाकाहारी पदार्थांमध्ये खीर आणि गुलाब जामुन यांचा समावेश होता.
बातम्या आणखी आहेत...