आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करण्यासाठी काश्मिरी विद्यार्थ्यांवर बळजबरी, मारहाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोएडा - श्रीनगर-पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी करावी, यासाठी बळजबरी करून आपल्याला मारहाण झाली, असा दावा तीन काश्मिरी विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यावर काश्मिरी विद्यार्थ्यांना सुरक्षा देण्यात असमर्थ असल्याचे किंवा आपली इच्छा नसल्याचे उत्तर प्रदेश सरकारने स्पष्ट करावे, अशी प्रतिक्रिया जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
पाच-सहा मद्यधुंद विद्यार्थी रविवारी रात्री खोलीवर आले होते. त्यांनी काश्मिरी विद्यार्थ्यांना धरून मारहाण केली, असे एका काश्मिरी विद्यार्थ्याने सांगितले. या विद्यार्थ्यांनी ‘इंडिया झिंदाबाद’, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा देण्यासाठी आमच्यावर दबाव टाकला. यातील काही विद्यार्थी मला दहशतवादी म्हणत होते, असा दावाही काश्मिरी विद्यार्थ्याने केला. दरम्यान, एशिया कप क्रिकेट सामन्याच्या वेळी अशाच प्रकारची घटना घडली होती. त्यावेळी पाकिस्तानी संघाच्या बाजूने चिअरिंग करणार्‍या 60 काश्मिरी विद्यार्थ्यांची मेरठ विद्यापीठातून हकालपट्टी करण्यात आली होती. दुसरीकडे यावरून राजकीय वातावरणदेखील तापू लागले आहे. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून विद्यापीठाला भेट देण्यासाठी आपण दिल्लीहून स्थानिक आयुक्त पाठवले आहेत, असे मुख्यमंत्री अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले.