आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताने मानवाधिकार आयोगाला ठणकावले, मानवी हक्क, पाक पुरस्कृत दहशतवादात फरक करा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाला काश्मीर प्रकरणी तिखट शब्दात उत्तर दिले आहे. कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी मानवी हक्काचे उल्लंघन आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद यांच्यातील फरक लक्षात घ्यावा, असे भारताने ठणकावले आहे.

भारत व पाकिस्तानने चौकशीसाठी आयोगाच्या चमुला काश्मिरात येऊ द्यावे, असे मानवाधिकार उच्चायुक्त जैद रा द अल हुसैन यांनी म्हटले होते. त्यावर भारताने आपली बाजू मांडताना आयोगाच्या डोळ्यात अंजन घातले. जम्मू आणि काश्मीरमध्ये मानवाधिकाराचे उल्लंघनाचे मुख्य कारण दहशतवाद हेच आहे आणि यासाठी आमचा शेजारी देश पाकीस्तानच जबाबदार आहे. कोणतीही स्वतंत्र चौकशी करणाऱ्यांनो आधी ही गोष्ट समजून घेतली पाहीजे की, परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, काश्मीर खोऱ्यात वर्तमान अशांतीचे मुख्य कारण पाकीस्तानातून येणारा दहशतवाद हेच आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी पत्र लिहून हे स्पष्ट केली आहे की, जम्मू-काश्मीरातील सद्दयस्थिती त्यावेळी बिघडली आहे जेव्हा अतिरेकी संघटन हिज्बुल मुजाहीदीनचा कमांडर बुर्हान वानीला चकमकीत सुरक्षा दलाने मारले होते. परिस्थिती बिघडवण्यास तर पाकीस्तानने प्रोत्साहन दिले आहे. भारताने यावर भर दिला आहे की, पीओके आणी जम्मू-काश्मीरच्यामध्ये कोणतीही तुलना होऊ शकत नाही.कारण की जम्मू काश्मीरात जनतेद्वारे निवडलेले सरकार आहे. आणि पीओकेत पाकिस्तानी राजकारण्यास प्रमुख म्हणून नियुक्त केले गेले आहे. हे देखील सांगण्यात आले की, १२ ऑगस्ट २०१६ रोजी सर्वपक्षीय बैठकीत जम्मू काश्मीरच्या स्थितीवर चर्चा केली गेली आहे.
बातम्या आणखी आहेत...