आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Kashmiri Migrants Rehab Rajnath Writes To Omar Seeking Land, News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काश्मीरी पंडितांच्या पुनर्वनासाठी जागा द्या, गृहमंत्र्यांचे ओमर अब्‍दुल्‍लांना पत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारा काश्मीरमधील विस्थापित झालेल्या पंडितांच्या पुनर्वसनासाठी अनुकूल जागेचा शोध घेण्याच्या सूचनाही राजनाथ सिंह यांनी दिल्या आहेत.

काश्मिरी पंडितांचे स्वतंत्र पुनर्वसनाचा मुद्दा महत्त्वाचा असून केंद्र सरकारने त्यांच्या पुनर्वसनासाठी 500 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केल्याचेही राजनाथ यांनी म्हटले आहे.

नव्वदच्या दशकामध्ये काश्मिर खोर्‍यात दहशतवादी कारवाई झाल्याने लाखों काश्मिरी पंडितांना विस्थापित व्हावे लागले होते. विस्थापित पंडितांना आजही जम्मू आणि दिल्लीतील विस्थापित शिबिरांमध्ये राहावे लागत आहे.
दरम्यान, भाजपने लोकसभा निवडणूक जाहीरनाम्यामध्ये काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाचे आश्वासन दिले होते. राजनाथ सिंह यांनी आता या आश्वासनाचा पाठपुरावा सुरू केला असून अब्दुल्ला यांनी पंडितांसाठी अनुकूल जागेचा शोध घेण्यासाठी सहकार्य करावे, अशा सूचना सिंह यांनी केली आहे.
जम्मू- काश्मीरमध्ये पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने तयारीला सुरुवात केली आहे. दुसरीकडे, काश्मिरी पंडितांचे स्वतंत्र पुनर्वसन करून त्यांचा स्वतंत्र प्रांत करू नये, अशी मागणी पीडीपी या जम्मू व काश्मिरमधल्या दुस-या महत्त्वाच्या पक्षाने केली आहे.

(फाइल फोटोः राजनाथ सिंह यांची भेट घेताना ओमर अब्दुल्ला)