आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kashmiri Separatist Leader Mirwaiz Cheers For Pak After Champions Trophy Win Over England

फायनलसाठी पाक संघाला काश्मिरी फुटीरतावादी नेत्याच्या शुभेच्छा, ट्विट करून केले अभिनंदन...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काश्मीरी फुटरवादी नेता मीरवाईज यांनी ट्विट करुन पाक टीमला शुभेच्छा दिल्या. - Divya Marathi
काश्मीरी फुटरवादी नेता मीरवाईज यांनी ट्विट करुन पाक टीमला शुभेच्छा दिल्या.
नवी दिल्ली - चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानने इंग्लंडवर मिळवलेल्या विजयाबद्दल फुरतावादी नेते मीरवाइज उमर फारुख यांनी पाकिस्तानी खेळाडूंचे अभिनंदन केले असून फायनलासाठी शुभेच्छा दिल्या आहे. बुधवारी पाकिस्तानने इंग्लंडवर 8 विकेट राखून विजय मिळवला होता. 
 
मीरवाइजने केले ट्विट
- मीरवाइज यांनी ट्विट करुन पाकिस्तान संघाचे अभिनंदन केले. ते म्हणाले, 'आज आमची तरावीह (रमजानच्या महिन्यातील संध्याकाळी केली जाणारी प्रार्थना) संपली आणि फटाक्यांचे आवाज कानी आले. पाकिस्तानने आज शानदार खेळ केला. फायनलासाठी शुभेच्छा.'
- इंग्लंडने पाकला 212 रनचे टार्गेट दिले होते. पाकिस्तानने दोन विकेट गमावत हे लक्ष्य पार केले. विशेष म्हणजे तेव्हा 12.5 षटके शिल्लक होती. 
- इंग्लंडला पराभूत करुन पाकिस्तान टीम फायनलमध्ये पोहोचली आहे. आता त्यांचा सामना आज होणाऱ्या भारत-बांगलादेश सामन्यातील विजेत्याशी होणार आहे.
 
पाकिस्तान प्रथमच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये
- चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु झाल्यापासून गेल्या 19 वर्षांमध्ये पाकिस्तानला फायनलमध्ये पोहोचण्याची प्रथमच संधी मिळाली आहे. याआधी तीनवेळा ते सेमीफायनलमध्ये पोहोचले आणि पराभूत होऊन बाहेर पडले होते. 
- पाकिस्तान टीम याआधी 2000, 2004 आणि 2009 मध्ये सेमीफायनलमध्ये पोहोचली होती. मात्र तिन्ही वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. पाक टीमने प्रथमच आयसीसी टुर्नामेंटच्या फायनलमध्ये धडक मारली आहे.