नोएडा- ग्रेटर नोएडातील एका खासगी विद्यापिठात शिकत असलेल्या तीन काश्मिरी विद्यार्थ्यांना त्यांच्या सहकारी विद्यार्थ्यांनी बेदम मारहाण केली आणि जबरदस्तीने पाकिस्तानविरोधी घोषणा देण्यात लावले. यावर जम्मू आणि काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून काश्मिरी विद्यार्थ्यांना पुरेशी सुरक्षा पुरविण्यात उत्तर प्रदेश सरकार अयशस्वी ठरले आहे, असा आरोप केला आहे.
यापूर्वी आशिया कप सुरू असताना भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तान क्रिकेट संघाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याने मिरत विद्यापिठाच्या 60 काश्मिरी विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणी विद्यापिठाच्या कुलगुरूंनी पोलिस तक्रारही दाखल केली होती. परंतु, जम्मू आणि काश्मिर सरकारने दबाव टाकल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने पोलिस तक्रार मागे घेतली होती.
ग्रेटर नोएडातील घटनेसंदर्भात काश्मिरी विद्यार्थ्याने सांगितले, की मी नोएडा आंतरराष्ट्रीय विद्यापिठात शिकतो. पाच ते सहा जणांच्या टोळक्याने दारुच्या नशेत मला मारहाण केली. मला शिविगाळ केली.
त्यांनी रात्रीच्या सुमारास माझ्या रुमचे दार ठोठावले. मी दार उघडले नाही. त्यानंतर ते जबरदस्तीने माझ्या रुममध्ये शिरले. मला बेदम मारहाण केली. माझ्यासोबत आणखी काश्मिरी विद्यार्थी आहेत का, अशी विचारणाही केली. आम्ही राहत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी तीघे काश्मिरी आहोत. त्यानंतर त्यांनी तिघांनाही मारहाण केली. असे यापूर्वीही घटले आहे.
त्यानंतर त्यांनी इंडिया जिंदाबादचे नारे देण्यास सांगितले. नंतर पाकिस्तान मुरदाबादचे नारे देण्यास सांगितले. आम्ही असे का करावे, असे मी त्यांना म्हटल्यावर त्यांनी पुन्हा मारहाण केली. आम्हाला दहशतवादी म्हटले.
यावर प्रतिक्रिया देताना ओमर अब्दुल्ला म्हणाले, की जर उत्तर प्रदेश प्रशासन आणि विद्यापिठ काश्मिरी विद्यार्थ्यांना पुरेशी सुरक्षा देऊ शकत नसेल तर त्यांनी आपली निष्क्रियता स्वीकारावी.
ट्विटरवर काय म्हणाले ओमर अब्दुल्ला वाचा पुढील स्लाईडवर...