आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kate Middleton Is Center Of Attraction Because Of Her Dresses

प्रिन्सेस केटच्या ड्रेसची आहे जगभरात चर्चा, भारतात आल्यानंतर असा बदलला Look

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चॅरिटी मॅच आणि सलाम बालक ट्रस्टच्या वेळी केट मिडलटन. - Divya Marathi
चॅरिटी मॅच आणि सलाम बालक ट्रस्टच्या वेळी केट मिडलटन.
नवी दिल्ली/मुंबई - ब्रिटनचे प्रिन्स विल्यम्स आणि त्यांची पत्नी डचेज ऑफ कॅम्ब्रिज केट मिडलटन सध्या भारत दौऱ्यावर आहेत. मुंबई आणि दिल्लीतील चॅरिटी कार्यक्रमांमध्ये ते सध्या सहभागी होत आहेत. या कार्यक्रमांमध्ये केट परिधान करत असलेले ड्रेस आणि तिच्या झुमक्यांचीही चर्चा आहे. एका दिवसांत केट तीन ते चार वेळा ड्रेस बदलत असल्याचे समोर येत आहे.

- केट महिलांसाठी फॅशन आयकॉन आहे. तिने भारत दौऱ्यात भारतीय आणि ब्रिटीश मिश्रण असलेल्या ड्रेसेसना प्राधान्य दिले आहे.
- मुंबईत चॅरिटी मॅचदरम्यान केटने लांब मोगल प्रिंटेड ट्युनिक ड्रेसमध्ये दिसून आली होती.
- मैचदरम्यान केटचा ड्रेस पाहून डिझायनर अनिता डोंगरही आश्चर्यचकित झाली होती.

साइट झाली क्रॅश
- केटच्या वेबसाइटवर एवढे लोक आले की, तिची साइट क्रॅश झाली.
- दिल्लीत सलाम बालक ट्रस्टच्या मुलांबरोबर झालेल्या कार्यक्रमात केटने एक फ्रॉक परिधान केला होता. तो केवळ 4700 रुपयांचा आहे.
- त्यापूर्वी पीएम मोदींबरोबर ती हिरव्या रंगाच्या ब्रिटीश पोशाखात होती. टेंपरले लंडनने डिझाइन केलेला हा ड्रेस 76 हजारांचा होता.
- इंडिया गेटवर फिरायला गेली त्यावेळी केट क्रीम कलरचा कॉलर असलेला ड्रेस परिधान करून होती.

पुढील स्लाइड्सवर पाहा, भारत दौऱ्यावर आलेल्या केटचे आणखी काही PHOTOS