आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाडक्या श्वानांना ठेवा रंगापासून दूर, रंगामुळे मुक्या प्राण्यांना त्वचेसंंबंधी विकारांची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- रंगोत्सवात नैसर्गिक रंगांचा वापर करण्याबाबतची जागृती वाढू लागली आहे, परंतु अजूनही देशभरात सार्वजनिक ठिकाणी रासायनिक रंगांचा वापर सर्रास केला जातो. आनंदाच्या भरात लाडक्या श्वानालाही रंगवले जाते. हे कटाक्षाने टाळावे, अन्यथा अशा रंगामुळे तुमच्या श्वानाचा त्रास वाढू शकतो, असा इशारा प्राणी हक्क संघटनांनी दिला आहे.  

मानवी शरीर व श्वानासारख्या प्राण्याच्या शरीराची रचना भिन्न असते. माणसाला घाम यावा यासाठी विशिष्ट ग्रंथी असतात. श्वानाला मात्र निसर्गाने तशी व्यवस्था दिलेली नाही. त्यामुळे रासायनिक रंगामुळे मुक्या प्राण्यांना त्वचेसंबंधीचा त्रास होऊ लागतो. उत्सवाच्या वातावरणात घरातील असे मुके प्राणी रंगांचे पाणी पितात. त्यातून त्यांना गंभीर स्वरूपाचे यकृताचे आजार जडू शकतात. काही प्रसंगी त्यांच्यावर मृत्यूदेखील आेढवतो, असा दावा डॉ. आर. टी. शर्मा यांनी केला आहे. ते पेट अॅनिमल वेल्फेअर सोसायटीचे पदाधिकारी आहेत.  

थंड पाणीही टाळा  
उत्सव काळात प्राण्यांना क्रूर वागणूक मिळते. याबाबत फ्रेंडइकोज नावाची संस्था जनजागृतीचे कार्य करते. उत्सवात उत्साह शिगेला पोहोचतो. लोक संगीत-नृत्याच्या तालावर आनंद साजरा करतात. परंतु त्यादरम्यान पाळीव प्राण्यांचे हाल होतात. याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते. प्राण्यांवर थंड पाणी फेकणे, कर्णकर्कश आवाज करू नये. त्यामुळे परिसरातील प्राणी घाबरून जातात, असे मँडी सेठ यांनी सांगितले.

दुष्परिणाम असे
प्राण्यांना रंग लावल्यास किंवा कर्णकर्कश आवाजाने प्राण्यांमध्ये अस्वस्थता वाढते. ते आक्रमक होऊ शकतात. त्यातून समस्या वाढू शकते. रंग किंवा आवाजाचा परिणाम झालेल्या पाळीव प्राण्यांच्या वागण्यात एकदम बदल झालेला दिसून येतो. श्वान डोळे मोठे करू लागतात. रंगामुळेदेखील त्यांचे विस्फारणे वाढते. अशावेळी  त्यांना गरम पाण्याने स्नान घालून तत्काळ पशुवैद्यकाकडे नेले पाहिजे.
बातम्या आणखी आहेत...