आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Keep In Mind, I Am Not Rahul Gandhi Kejriawal Warned Modi

मोदींनी लक्षात घ्यावे, मी राहुल गांधी नाही: केजरीवालांचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शुक्रवारी पुन्हा एकदा जोरदार टीका केली. ते म्हणाले, की मोदी व भाजप दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभव पचवू शकत नाहीत. त्यामुळे नायब राज्यपाल नजीब जंग यांना हाताशी धरून दिल्लीच्या जनतेवर सूड उगवत आहेत. परंतु मोदींनी हे लक्षात घ्यावे की मी राहुल गांधी नाही. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, मोदींनी हे स्वीकारले पाहिजे की, जनतेने त्यांना देश चालवण्यासाठी तर मला दिल्लीकरांनी राज्य चालवण्यासाठी निवडून िदले आहे. भाजपाध्यक्ष अमित शहांच्या चौकीदाराने बाेलावले तरीही नायब राज्यपाल नजीब जंग रांगत जातील, अशी टीकाही त्यांनी केली.