आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kejriwal Gadkari News In Marathi, AAP, BJP, Divya Marathi

राजधानीत नितीन गडकरी- अरविंद केजरीवाल यांची भारावलेली भेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे दोघेही आक्रमक आहेत; परंतु तेवढेच संवेदनशील! गेला बाजार दोघांचेही विळ्या-भोपळ्याचे नाते होते. भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे थेट न्यायालयापर्यंत पोहोचलेले हे नेते; परंतु हळव्या मनाच्या अरविंद केजरीवाल यांना ई-रिक्षाबाबतची गडकरींनी घेतलेली भूमिका मनाला भिडली. मतांतरे दूर ठेवत त्यांनी आज गडकरी यांची भेट घेतली. गरिबांना न्याय मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या या नेत्यांची ही भेट सगळ्यांसाठीच आनंददायी होती.
आम आदमी पक्षाच्या स्थापनेनंतर भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ म्हणून अरविंद केजरीवाल हे नावारूपास आले.

देशातील तरुणाई केजरीवाल यांच्याकडे आकर्षित होत असतानाच त्यांची दिशाभूल करणाऱ्यांची मोठी फळीही त्यांच्या भोवताल पिंगा घालू लागली. यातूनच भ्रष्टाचारी नेते कोण, याची यादी केजरीवाल यांनी तयार केली. त्यात नितीन गडकरी यांचेही नाव होते. गडकरींच्या विरोधात अंजली दमानिया यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. प्रचारामध्ये आम आदमी पक्षाने गडकरींच्या भ्रष्टाचाराच्या कथा ऐकवल्या. आरोप केल्यामुळे शांत बसतील ते गडकरी कुठले? त्यांनी न्यायालयात धाव घेतली आणि आरोप सिद्ध करायला सांगितले. न्यायालयाने यात केजरीवाल यांना शिक्षा दिली. अजूनही हे आरोप सिद्ध व्हायचे आहेत. गडकरींबाबत तीव्र क्रोध असलेल्या केजरीवाल यांना गडकरींमधील माणूस दिसला तो ई-रिक्षा पुन्हा सुरू करण्याच्या निमित्ताने. कष्टकऱ्यांसाठी झटणारे केजरीवाल यांना राहवले नाही. त्यांनी मंगळवारी आशुतोष आणि संजय सिंग यांच्यासह परिवहन मंत्रालयात गडकरींची भेट घेतली आिण गडकरींच्या निर्णयाचे स्वागत केले.

केजरीवाल यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता
केजरीवालांना गडकरींमधील माणूस दिसल्याने ते कमालीचे प्रसन्न होते. दिल्लीत ई -रिक्षा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पावसामुळे सडत आहेत. याकडे केजरीवालांनी लक्ष वेधले. तेव्हा गडकरींनी पोलिस आयुक्तांना फोन करून या रिक्षा परत देण्याच्या सूचना दलि्या; परंतु न्यायालयीन अडथळे अद्याप दूर व्हायचे असल्याने आठवड्यानंतर रिक्षा मिळतील. रिक्षाचालक हेच त्या रिक्षाचे मालक असावेत, अशी भूमिका गडकरींनी केजरीवालांना सांगितली, तेव्हा ते भारावले अन् गरिबांसाठी काम होत राहो यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.