आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SURVEY : किरण बेदींच्या प्रवेशानंतर BJP ची मते 4 टक्यांनी घटली, AAP ला फायदा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एका ताज्या सर्वेक्षणानुसार दिल्लीमध्ये किरण बेदींच्या भाजप प्रवेशाने आपला अधिक फायदा झाला आहे. एबीपी न्यूज-नील्सच्या सर्वेक्षणानुसार केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून पसंती मिळवली आहे. पण त्याचबरोबर त्यांचा आम आदमी पक्ष भाजपपेक्षा पुढे असल्याचेही समोर आले आहे.

सर्वेक्षणाचे अंदाज

सर्वेक्षणानुसार दिल्लीचे 50 टक्के लोक ‘आप’ला मत देऊ इच्छितात. तर 41 टक्के लोक भाजपला मत देणार असल्याचे सांगत आहेत. काँग्रेस या स्पर्धेत अत्यंत मागे असून केवळ 9 टक्के लोक त्यांना मत देण्यास तयार आहेत.

मुस्लीम, दलित, आदिवासी आणि मागास वर्गामध्ये ‘आप’ सर्वाधिक लोकप्रिय आहे. विसेष म्हणजे जानेवारी महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात ‘आप’ला 46 टक्के मते मिळण्याची शक्यता होती. पण त्यांची मते चार टक्क्यांनी वाढली आहेत.

तर भाजपला दुसर्‍या आठवड्यात 45 टक्के मते मिळण्याची शक्यता होती पण 4 टक्के कमी मते मिळाल्याने ते 41 टक्क्यांवर पोहोचले आहेत. सर्वेक्षणाच्या अंदाजांनुसार तसे पाहता, सर्वच वयोगटातील मतदारांचा आपला पाठिंबा आहे पण आतापर्यंत भाजपला सर्वाधिक साथ मिळालेल्या तरुणांचा म्हणदे 18 ते 23 वयोगटातील मतदारांमध्ये आपची क्रेझ असल्याचे दिसते आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा सर्वेक्षणात समोर आलेली काही रंजक माहिती...